आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी बसची दुचाकीला धडक, दोन ठार- चिखली येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली- भरधाव जाणाऱ्या एसटी बस दुचाकीची समोरासमोर धडक होवून दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना चिखली येथील महाबीज परिसरात आज १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.

जाफ्राबाद तालुक्यातील रास्तळ येथील विठ्ठल भगवान जाधव वय २२ हा देऊळगावराजा येथील नातेवाईक राजू गणेश शिंदे वय ३० यांच्यासोबत एम.एच. २१/ एके/ २२५२ या क्रमांकाच्या दुचाकीने चिखलीहून रास्तळकडे जात होता. शहराच्या काही अंतरावर असलेल्या महाबिज परिसरात येताच त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एम.एच. ४०/ ९६९८ या क्रमांकाच्या औरंगाबाद ते खामगाव या बसने जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकीचा चुराडा झाला आहे. या प्रकरणी शिवहरी जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...