आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने दोन जण जागीच ठार; पाच गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - पातूर-वाशीममहामार्गावर पंचायत समिती कार्यालयासमाेर ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात होऊन ट्रकच्या खाली दबल्याने दोन जण जागीच ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना १७ मार्च रोजी दुपारी वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये हॉटेलचालक गजानन सातव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सल्लागार अॅड. अनिल टाले हे जागीच ठार झाले. ट्रकचालक रामबाबू व्यंकटेश स्वामी पतरू, रा. जिंगडरू, जि. कृष्णा, आंध्र प्रदेश (वय २९) याला पोलिसांनी अटक केली असून, क्लीनर व्यंकटेशराव स्वामी पजजुरू (वय २९) हा किरकोळ जखमी असून, उपचार घेत आहे. पातूर-वाशीम महामार्गावरून वाशीमकडून मिरचीने भरलेला एपी १६ टीजी १११६ क्रमांकाचा ट्रक भरधाव पातूरकडे येत होता. ट्रकचालकाने सुरुवातीला पातूर न्यायालयासमोरील दुचाकी उडवली. त्यानंतर पातूर तहसीलसमोरील झाडाला टक्कर मारल्याने निंबाचे भव्य झाड रस्त्यावर कोसळले. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या वेळी पातूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज द्वाराजवळील गजानन सातव यांच्या हॉटेलमध्ये वकील, पत्रकार ग्रामीण विभागातील नागरिक बसून होते. चहा घेत असताना वेगात आलेला ट्रक हॉटेलमध्ये घुसला. हॉटेलचालक गजानन सातव, रा. पातूर, चिरा चौक, वय ५० वर्षेे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सल्लागार अॅड. अनिल टाले हे ट्रकखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण हॉटेलचा चुराडा होऊन ट्रकखाली दबलेल्यांना काढण्यासाठी हजारो नागरिकांनी धाव घेतली. ट्रकमध्ये मिरचीचे भरलेले पोते असल्याने जेसीबीची मदत घेण्यात आली. मात्र, ट्रक हलत नसल्याने शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या युवकांनी ट्रकमधील संपूर्ण पोते काढले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रकखाली दबलेल्यांना बाहेर काढले. यामध्ये गजानन सातव, अॅड. अनिल टाले यांचा मृत्यू झाला हाेता. अनिल इंगळे, प्रकश घुगे, भानुदास घुगे, हॉटेलचालक क्लीनर जखमी झाले.
अकोला मुख्यालयातील पोलिस पथकानेही येथे हजेरी लावली. घटनास्थळी नगर परिषद अध्यक्ष हिदायत खान, मुख्याधिकारी मिलिंद दारोकार, तहसीलदार राजेश वझिरे, गटविकास अधिकारी मुरकुटे, अ. कय्युम सौदागर, नगर परिषद सदस्य राजू उगले, गटनेते परशराम उंबरकार, योगेश इंगळे, शिर्ला ग्रामपंचायत सदस्य सिरसाट यांच्यासह सर्व नगर परिषद सदस्यांनीही धाव घेतली. रात्री उशिरा पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
"धर्मवीर'नेपाळला माणुसकीचा धर्म : जखमींना१०८ रुग्णवाहिकेने वाशीम, वाडेगाव, पातूर येथील रुग्णवाहिकेने उपचारार्थ अकोला हलवले. धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष सचिन बारोकार यांनी मास कॅज्युनिटी यानुसार जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका बोलावून मृतक, जखमींना सर्वोपचारमध्ये जलगतीने पाठवले.
अकोलामुख्यालयातील पोलिस पथकानेही येथे हजेरी लावली. त्यांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी धाव घेतली. घटनास्थळी नगर परिषद अध्यक्ष हिदायत खान, मुख्याधिकारी मिलिंद दारोकार, तहसीलदार राजेश वझिरे, गटविकास अधिकारी मुरकुटे, अ. कय्युम सौदागर, नगर परिषद सदस्य राजू उगले, गटनेते परशराम उंबरकार, योगेश इंगळे, शिर्ला ग्रामपंचायत सदस्य सिरसाट यांच्यासह सर्व नगर परिषद सदस्यांनीही धाव घेतली. रात्री उशिरा पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

"धर्मवीर'नेपाळला माणुसकीचा धर्म : ट्रकखालीदबलेल्या जखमींना १०८ रुग्णवाहिकेने वाशीम, वाडेगाव, पातूर येथील रुग्णवाहिकेने उपचारार्थ अकोला हलवण्यात आले. धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष सचिन बारोकार यांनी मास कॅज्युनिटी यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका बोलावून मृतक, जखमींना अकोला सर्वोपचारमध्ये जलगतीने पाठवले. त्यांच्यामुळे जखमींना तत्काळ उपचारार्थ भरती करता आले.

मुलीचे लग्न; पत्नी मुलाची अखेरची भेट
येत्या आठवड्यात २८ मार्च रोजी हॉटेलचालक गजानन सातव यांच्या मुलीचे लग्न होते. त्यांची पत्नी आज घटनेपूर्वी हाॅटेलवर मुलासह भेटायला आली होती. मात्र, ती भेट अखेरची ठरली. त्यामुळे सातव परिवारावर शोककळा पसरली आहे.

महामार्ग शहराबाहेरून वळवण्याचे प्रयत्न
महामार्गावरतहसील, न्यायालय, पंचायत समिती, खरेदी निबंधक कार्यालय असल्यामुळे शहरासह ग्रामीण विभागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. महामार्ग हा पातूर शहराबाहेरून एमआयडीसी परिसरातून पातूर घाटापर्यंत काढण्याचे प्रयत्न दोन-तीन वर्षांपासून सुरू आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

अतिक्रमणही ठरतेय अपघाताला निमंत्रण
गतवर्षी तहसीलसमोरच भरधाव ट्रक उलटला होता. ट्रकखाली दबून तीन जण ठार झाले होते. येथील अतिक्रमणही अपघातास कारणीभूत ठरत आहे. गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी शहरात रुजू होताच पंचायत समिती तहसीलसमाेरील अतिक्रमितांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमण कायमच आहे. दरम्यान, तहसीलदार राजेश वझिरे यांनी गतवर्षी तहसीलसमोरील अतिक्रमित हॉटेल दुकाने बंद केली होती.

दोन तासांपर्यंत वाहतूक होती ठप्प
महामार्गावर गर्दी झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधील मिरचीच्या पोत्यामुळे काही पोते फुटल्याने मदतकार्य करणाऱ्यांना अडचण आली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपुरे कर्मचारी असल्याने दोन तास वाहतूक खोळंबली होती. पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जुमळे अकोल्यावरून आल्यानंतर त्यांनी गर्दीला पांगवले.

बातम्या आणखी आहेत...