आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचे दाेन संयशित रुग्ण आढळले, उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्वाइनफ्लूचे दाेन संयशित रुग्ण शनिवारी अाढळले असून, त्यांच्यावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. हे दाेन्ही रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील अाहेत. संताेष पांडुरंग उकर्डे (रा. संग्रामपूर) सरला भरत सवडतकर (मलकापूर) ही रुग्णांची नावे अाहेत.

जुलैनंतर अाता अाॅगस्टमध्येही स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण अाढळून येत अाहेत. गरोदर माता, एका वर्षाखालील बालके ६५ वर्षांवरील नागरिकांना स्वाइन फ्लूच्या विळख्यात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एचएन विषाणू सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी भंडारज येथील एकाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने सतर्क हाेणे गरजेचे हाेते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच काहीच दिवसांपूर्वी गुलजारपुरा, वाशीम बायपास भागातील तसलीम खाँ नुर खाँ,( वय ५१ वर्षे ) या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला हाेता. शहरातील खासगी रुग्णालयात त्याला उपचारार्थ भरती केले होते. तपासण्या केल्या असता हा व्यक्ती स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह निघाला हाेता. याशिवाय बोरगावमंजू येथील एक रुग्ण स्वाइन फ्लू सदृश अाढळून अाला हाेता. दरम्यान, शनिवारी बुलढाणा जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे दाेन संशयित रुग्ण अाढळून अाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत.

यंदा तिघांचा मृत्यू
यंदाअातापर्यंत स्वाइन फ्लूचे रुग्ण अाढळले हाेते. त्यापैकी तीन रुग्ण मृत्युमुखी पडले अाहेत. अाता बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण अाढळले. त्यामुळे अाराेग्य यंत्रणा सतर्क झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...