आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव जाणऱ्या मेटॅडोरच्या धडकेने दुचाकीस्वार दाम्पत्य ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार- भरधाव जाणऱ्या मेटॅडोर ४०७ ने समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज मे रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास लोणार- मेहकर दरम्यान वडगाव तेजन गावाजवळ घडली. या अपघातात चिखली तालुक्यातील रायपूर येथील दाम्पत्य ठार झाल्याने रायपूर गावावर शोककळा पसरली आहे. 
 
चिखली तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे वय ४५ त्यांच्या पत्नी संगीता संजय चौथे वय ३५ हे दोघे पती पत्नी आज सकाळी सावडण्याच्या कार्यक्रमाला लोणारकडे येत होते. यावेळी सोबत त्यांचा दहा वर्षीय मुलगा होता. चिखलीत येताच मुलाने मामाकडे जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे त्यांनी त्याला जालना एसटी बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर ते लोणारकडे दुचाकीने निघाले. परंतु वडगाव तेजनजवळ येताच त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या एम.एच. २०/ एटी/ ६८३१ या क्रमांकाच्या मेटॅडोरने जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर मेटॅडोर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भाऊसाहेब सातपुते यांनी तातडीने नाकाबंदी करून अवघ्या अर्ध्या तासातच वाहनास पकडले. गुन्हा दाखल करून चालकास अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खोब्रागडे रविंद्र इंगळे हे करीत आहेत. या घटनेतील मृतक संजय चौथे यांचे स्टील भांड्याचे छोटेसे दुकान होते. गावोगावी जावून भांड्याचा व्यवसाय करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मृतकाच्या पश्चात अश्विनी चौथे वय २० वर्षे, पल्लवी चौथे १६ दहा वर्षाचा मुलगा अशी तीन अपत्य आहेत. आई वडील ठार झाल्यामुळे तीनही मुले अनाथ झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...