आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबा नजिक एका पीकअप वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना शनिवार, २२ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजताच्यादरम्यान घडली.
अकोलाकडून कंपनीचे पिकअप वाहन बोरगावमंजूकडे भरधाव वेगात येत होते, तर बोरगावमंजूकडून शिवरसाठी आपल्या एमएच ३०, एएल १२८४ क्रमांकाच्या मोटारसायकलने जात असताना पिकअप वाहनाने दुचाकीला धडकी दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार किसनराव नारायण सावरकर, वय ५८ वर्ष हे गंभीर जखमी झाले. त्यांना मूर्तिजापूर येथील गुलाब दुबे यांनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या पीकअप वाहनाचा पाठलाग करून ती गाडी दुबेंनी पकडली. दरम्यान, घटनेची माहिती बोरगावमंजू पोलिसांना मिळताच पीएसआय संदिप साबळे, पीएसआय अशोक पितळे, हेड कॉन्स्टेबल अरुण गावंडे, पंचवटकर, इंगळे, बकावार यांनी घटनास्थळावर धाव घेतली. वाहन ताब्यात घेतले. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुलाब दुबे यांनी जपली माणुसकी
पीकअप वाहनाचा पाठलाग करून जखमी मोटारसायकलस्वारास जिल्हा सर्वोपचारमध्ये दाखल करून गुलाब दुबे यांनी सामाजिक बांधिलकीचे व्रत जपले आहे. त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...