आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय, एलसीबीने तिघांना केली रविवारी अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरात दुचाकी चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या दररोज घडणाऱ्या घटनांवरून दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मात्र अपयश येत आहे. 
 
गेल्या काही महिन्यांपासून अकोला शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. दुचाकी चोरीला गेल्यानंतर नागरिकांकडून पोलिसात तक्रार देण्यात येते. मात्र दुचाकी चोरीच्या तपासात पोलिसांना पाहिजे, त्या प्रमाणात यश येत नाही. काही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने या घटना घडत आहेत. अनेकदा पोलिसांकडून शोधच लागत नाही, म्हणून नावापुरत्या तक्रारी केल्या जातात. पोलिसही त्यात गुन्हा दाखल करीत नाहीत. गुन्हा दाखल होत नसल्याने पोलिस तपासात गांभीर्य दाखवत नाहीत. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचे फावत असून खुलेआम दुचाकी चोरीचा धंदा सुरू आहे. दरम्यान, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर दुचाकीवर बनावट नंबर टाकून देणाऱ्याला सुद्धा पहिल्यांदाच अटक झाली आहे. 

नंबरटाकून देणाऱ्यांवर कारवाई नाही : दुचाकीचोरल्यानंतर त्या दुचाकींचे नंबर मिटवण्यात येतात बनावट नंबर प्लेट लावण्यात येते. ही नंबर प्लेट सहजासहजी कुणालाही तयार करून मिळते. १०० रुपयांमध्ये वाहनांवर नंबर टाकून दिल्या जातो. त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची तपासणी होत नाही. चोरीच्या गाडीचा शोध लागल्यानंतर त्या गाडीचा नंबर हमखास बदललेला असतो. हा नंबर कुणी टाकून दिला. याबाबत सिव्हिल लाइन्स पोलिस वगळता कोणत्याही पोलिसांनी वाहनांवर नंबर टाकून देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही किंवा त्याची साधी विचारपूस केल्याचे ऐकिवात नाही. शहरात सर्रास वाहनांवर नंबर टाकून देण्यात येतात. कागदपत्रे तपासता वाहनांवर नंबर का टाकल्या जातात. त्याची चौकशी पोलिस आता करणार काय, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

रेल्वे स्टेशन रोड 
नंबर प्लेट १०० रुपयात मिळते, ती बनवताना कोणत्याही कागदपत्राची तपासणी होत नाही 
Àदुचाकी चोरांच्या मुस‍क्या आवळण्याची गरज. 
Àगाड्या चोरणाऱ्या टोळीने घातला आहे धुमाकूळ. 
Àबाजारपेठेतून भरदिवसा दुचाकीची चोरी. 

चोरट्यांनी मांडला उच्छाद 
सध्या दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकी परत मिळण्याचा आशा धूसर झाल्या आहेत. त्यातील काही बेवारस स्वरुपात आढळून आल्या आहेत. दुचाकी चोरीचे सत्र वाढल्यानेे वाहनांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दुचाकी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांची टीम अपयशी ठरली अाहे. 

स्थानिक गुन्हे शाखेला गुरुवारी शिवसेना वसाहतीमध्ये राहणारा संजय श्रीधर पवार याने घरात दुचाकी लपवल्या आहेत, या माहितीवरून त्याच्या घराची झडती घेतली असता तीन दुचाकी दिसून आल्या. दोन दुचाकी त्याने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून तर एक शेगाव येथून चोरल्याचे सांगितले. यावेळी संजय पवार याला त्याचे मित्र नायगाव येथील विनोद डिगांबर गवई शिवसेना वसाहतमधील देवानंद सुरेश जाधव यांनाही सोबत केल्यावरून त्यांनाही अटक केली. तिघांमिळून चोरी करत असल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात एएसआय अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद यांनी केली. 

सीसीटीव्ही लावण्याची गरज, वाहनांची गर्दी वाढली 
गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चाकरमानी या शहराला पसंती देत आहेत. त्यामुळे शहरात वाहनांची रेलचेल वाढली आहे. शहरासह तालुक्यात वाहनांची गर्दी वाढली असताना चोरट्यांनी दुचाकी चोरीवर लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वाहन चोरीचा छडा लावण्यात अपयश आले आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करत दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण पाहता दुचाकीस्वार आता धास्तावले आहेत. आठवडी बाजारच्या दिवशी बाजारपेठेत गर्दी असते. त्यादिवशी बाजार तसेच शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातीलही लोक शहरात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचाच फायदा हे दुचाकी चोर घेत आहेत. भरदिवसा दुचाकी चोरी होत आहेत. गेल्या काही दिवसात रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसर, गांधी रोड, सिव्हिल लाइन्स रोड, विशेष करून हर्ष संकुल, एस.ए. कॉलेज परिसर, कौलखेड चौक, सर्वोपचार रुग्णालय आदी ठिकाणांहून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्याच्या नोंदी आहेत. 

गाड्या चोरणारी या टोळीने धुमाकूळ घातला आहे. 
शहरात सीसीटीव्ही बाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. अपार्टमेंटमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. मात्र अपार्टमेंटच्या सोसायटीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे लावल्या जात नाही. तेथे कॅमेरे लावल्यास प्रत्येकाला खर्चही कमी येणार असून येणाऱ्या जाणारा कॅमेऱ्यात कैद होईल आणि चोरीच्या घटना घडल्यास त्या उजागर करण्यात पोलिसांनाही मदत होईल. 

 
बातम्या आणखी आहेत...