आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन झोनमध्येच १२,२६३ ने मालमत्तांच्या संख्येत झाली वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअसेसमेंट मोहिमेतील कर्मचारी - Divya Marathi
रिअसेसमेंट मोहिमेतील कर्मचारी
अकोला- महापालिकाक्षेत्रात सुरू केलेल्या रिअसेसमेंट मोहिमेचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. आतापर्यंत दक्षिण झोनमधील संपूर्ण मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाले असून, पूर्व झोनमधील संपूर्ण मालमत्तांना क्रमांक देण्यात आले आहेत. या दोन्ही झोनमध्येच मालमत्तांच्या संख्येत १२,२६३ ने वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत महापालिकेला मालमत्ता करातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार, ही बाब आता स्पष्ट झाली आहे.
महापालिका क्षेत्रात मागील १५ वर्षांपासून रिअसेसमेंट झाले नव्हते. रिअसेसमेंट झाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला. महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कालावधी झाला असला तरी मालमत्ता कराचे उत्पन्न २० कोटींच्या वर गेले नव्हते. त्यामुळेच प्रशासनाने महापालिका क्षेत्रात रिअसेसमेंट करण्याचा निर्णय घेतला होता.
फेब्रुवारीपासून इमला पद्धतीने कर आकारला जाणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरातून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. सिंधी कॅम्पमधील मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाल्यावर दक्षिण झोनमधील उर्वरित मालमत्तांचे मोजमाप पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पूर्व झोनमधील मालमत्तांचे मोजमाप सुरू करण्यात आले. पूर्व झोनमधील संपूर्ण मालमत्तांना क्रमांक देण्यात आले आहेत, तर २४ हजार मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाले आहे.

उर्वरित अडीच हजार मालमत्तांचे मोजमाप येत्या पाच ते सात दिवसांत पूर्ण होईल. दरम्यान, क्रमांक देणाऱ्या पथकाने उत्तर झोनमधील मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू केले आहे. पूर्व आणि दक्षिण झोनमध्ये महापालिकेच्या दप्तरी असलेल्या मालमत्तांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत महापालिकेला मालमत्ता करातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

रिअसेसमेन्ट मोहिमेत जिल्हाधिकारी निवासस्थानाचेही मोजमाप करण्यात आले.
झोन उपलब्ध नोंद आत्ताची संख्या
पूर्व २१,२०६ २६,३२८
दक्षिण १७,४५९ २४,६००

ऑगस्टपर्यंत मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न
जवळपासदोन झोनमधील मालमत्ता मोजमाप पूर्ण होत आले आहे. उत्तर झोनमध्ये क्रमांक टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर पश्चिम झोनमधील मालमत्तांचे मोजमाप केले जाईल. ऑगस्टपर्यंत रिअसेसमेंटचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्मचारी सकाळपासून रिअसेसमेंटचे काम करत आहेत. माधुरीमडावी, उपायुक्त महापालिका.
उत्तर झोनमध्येही आठ हजार मालमत्तांना क्रमांक : पूर्वझोनमधील संपूर्ण मालमत्तांना क्रमांक देण्यात आल्याने क्रमांक देणाऱ्या पथकाने उत्तर झोनमधील मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत सात हजार ८०० पेक्षा अधिक मालमत्तांना क्रमांक देण्यात आला आहे. पूर्व झोनमधील मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाल्यानंतर पश्चिम झोनमधील मालमत्तांचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी निवासस्थानाचे मोजमाप पूर्ण
रिअसेसमेंटमोहिमेत जिल्हाधिकारी निवासस्थानाचे मोजमाप उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केले. आतापर्यंत जिल्हाधिकारी निवासस्थानाचे मोजमाप करण्यात आले नव्हते. त्यामुळेच जुन्या काळीच आकारण्यात आलेला कर अद्यापही आकारला जात आहे. परंतु, आता मोजमाप झाल्याने करातही वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्पन्नात वाढ होणार
पूर्वदक्षिण झोनमधील मालमत्तांच्या संख्येत १२ हजार २६३ ने वाढ झाली. या मालमत्तांकडून आतापर्यंत कर आकारणीच केलेेली नव्हती. आता कर आकारणी केली जाणार आहे. वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्तांच्या करात वाढ होणार असल्याने उत्पन्नातही वाढ होणार आहे.