आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक स्थळांवर पुन्हा कारवाई, आयुक्त अजय लहाने यांनी घेतली बुधवारी आढावा बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रात चार दिवसांपूर्वीच तीन अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. आता पुन्हा राहिलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. या अनुषंगानेच आयुक्त अजय लहाने यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका प्रकरणी न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची आदेश दिले आहेत. या अनुषंगानेच आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रस्तावित अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी किती कारवाई झाली? याची माहिती देण्यात आली. तसेच महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील अनधिकृत धार्मिक स्थळे निश्चित करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्याचे पथक गठीत करण्यात आले. क्षेत्र निहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. या पथकात बीट जमादार, तलाठी, आरोग्य निरिक्षक यांचाही समावेश करण्यात आला आहे. दहा नोव्हेंबर पर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना हा अहवाल सादर करावा लागणार आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी यु.एम.माने पाटील, उपायुकत् समाधान सोळंके, नगररचनाकार प्र.की.दांदळे, नायब तहसिलदार महेंद्र आत्राम, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कैलास पुंडे, जी.एम.पांडे, दिलीप जाधव, सहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...