आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्याची रेल्वेत महिलेसमोर लघुशंका, महिला प्रवाशांनी चाेप देऊन केले पाेलिसांच्या हवाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये धावत्या गाडीच्या आरक्षण बोगीत अकोला येथील अन्न औषध प्रशासन विभागाचा निरिक्षक नितीन महादेव नवलकर याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवासीसमोर लघुशंका केली अश्लिल वर्तन केले. महिलेसह प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला मनमाड रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

अकोला येथील रणपिसे नगरात नितीन नवलकार राहतो. गेल्या अनेक वर्षापासून तो अकोला अन्न औषध प्रशासन विभागात अन्न निरीक्षक पदावर कार्यरत आहे. कार्यालयीन मिटींगसाठी तो बुधवारी मुंबईला जात होता. रात्री साडेनऊ वाजता तो अकोला रेल्वेस्थानकावरून १२११२ अप अमरावती -मुंबई सुपरफस्ट एक्स्प्रेस या गाडीच्या बी आरक्षित कोच मध्ये बसला. त्याच्या शेजारी बर्थ नंबर ३१ वर वांद्रेपूर्व मुंबई येथील ४९ वयवर्षे असलेल्या महिलेचे बर्थ होते. नवलकार याने गाडीतच मद्यप्राशन केले होते. मध्यरात्रीनंतर मनमाड स्टेशन येण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर त्याने महिलेच्या शेजारीच लघुशंका केली. त्यामुळे झोपलेली महिला प्रवासी जागी झाली. त्यानंतर त्याने तिच्यासोबत अश्लिल वर्तन हावभाव केले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर प्रवाशीसुद्धा जागे झाले. त्यानंतर महिलेने प्रवाशांनी नवलकर याला चांगलेच बदडले. त्यानंतर नवलकार याने शौचालयाचा आसरा घेतला मात्र प्रवाशांनी त्यातही जाऊन मारहाण केली. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आल्यानंतर त्यांनी प्रवाशांंच्या तावडीतून त्याची सुटका करून खाली उतरवले मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून नवलकारविरुद्ध गुन्हे दाखल केले त्याला अटक केली. 

आरपीएफ ची सतर्कता 
आरोपी नितीन नवलकर याने लघुशंका केल्यानंतर महिलेसह इतर प्रवाशांनी त्याला मारहाण केली. घटनेची माहिती रेल्वेत असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ) यांना मिळाली. त्यांनी तत्काळ धाव घेत आरोपीची शौचालयामधून प्रवाशांच्या तावडीतून सुटका केली. 
बातम्या आणखी आहेत...