आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर बेलखेडच्या जि.प. उर्दू शाळेचे उघडले कुलूप, निवेदनानंतरही कार्यवाही होत नसल्याने घेतला होता निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - तालुक्यातील बेलखेड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार निवेदने दिल्यानंतरही कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त करत १३ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ३० जुलै रोजी खंडाळा दानापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील प्रत्येक एक अशा दोन शिक्षकांना बेलखेड येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ३१ जुलैपासून बेलखेड येथील शाळेचे कुलूप उघडण्यात आले.

बेलखेड येथील उर्दू शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून, चार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आरटीई अॅक्ट २००९ च्या निकषांनुसार रिक्त पदे भरण्यासाठी मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याचे लक्षात येताच पालक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करत पंचायत समितीच्या नजमुन्नीसा यांच्या नेतृत्वात शाळेला कुलूप ठोकले होते.

त्यानंतर तेल्हारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी खंडाळा दानापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांना आदेशित केले. बेलखेड येथील उर्दू शाळेत शिक्षक संख्या कमी असल्याने शिक्षकांच्या मागणीकरिता शाळा व्यवस्थापन समिती पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आपल्या शाळेवरील शे. राजिक आसीम अहमद या दोन शिक्षकांना बेलखेड येथे कार्याकरिता पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करावे. तसेच बेलखेड येथील मुख्याध्यापकांनी या दोन शिक्षकांना रुजू करून घ्यावे अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर हे दोन शिक्षक शाळेवर रुजू झाल्याने शाळेचे कुलून उघडले आहे.

विद्यार्थ्यांसह पालक झाले होते त्रस्त
उर्दूशिक्षकांची रिक्त असतानाही भरण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे पालकही चिंताग्रस्त झाले होते. अखेर शिक्षकांची भरती करण्यासाठी शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला होता.

"त्या' शिक्षकांना तात्पुरते नियुक्त केले
^उर्दूशिक्षकांची १६ पदे रिक्त आहेत. बेलखेड येथील शाळा बंद असल्याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यांच्या आदेशावरून दानापूर खंडाळा येथील उर्दू शिक्षकांना तात्पुरते बेलखेड येथे रूजू केले आहे.'' विनोदमानकर, प्र.गटशिक्षणाधिकारी

अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त
येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमधील शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त होती. आता दोन शिक्षक मिळाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.'' शे.कमरूद्दीन, अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती

शिक्षक मिळाल्याने नुकसान टळणार
शाळेमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळेच शाळेला कुलूप लावण्यात आले होते. अखेर या शाळेला दोन शिक्षक मिळाल्याने मुलांना फायदा होईल.'' अन्सारखाँपठाण, पालक

पं.स. सदस्यांची होती उपस्थिती
या निर्णयामुळे पंचायत समिती सदस्या नजमुन्नीसा शे. ग्यासोद्दीन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे. कमरोद्दीन, उपाध्यक्ष नूर महंमद, सदस्य शे. सलीम, शे. युनूस, कमर पठाण, शे. अन्वर, शे. जाबीर, शे. राजीक, रक्सानाबानो, शे. मजित, ग्रामपंचायतचे सदस्य, शिक्षक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उर्दू शाळेचे कुलूप उघडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...