आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील हॉटसिटीचे तापमान 47 अंश सेल्सियसवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- विदर्भातील हॉट सिटी म्हणून खामगावला ओळखले जाते. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाली आहे. मे रोजीचे शहराचे तापमान ४७.१ डिग्री सेल्सियसवर पोहोचले होते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना एसी कूलरचा सहारा घ्यावा लागत असून, दुपारच्या वेळी मात्र रस्ते निर्मनुष्य होत आहेत. मार्च २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात शहराच्या तापमानाचा पारा ४७ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही तापमानाचा पारा वाढत गेला होता. एप्रिलच्या मध्यंतरीच्या काळात तापमान खाली घसरले होते. ढगाळ वातावरणासह वाराही वाहत होता. मे महिन्यात तसेही ऊन अधिक असते. मे रोजी शहराचे तापमान ४५ डिग्री सेल्सियस, रोजी ४६, मे रोजी ४७ मे रोजी ४७.१ डिग्री सेल्सियसवर तापमान पोहोचले होते. सकाळी १० पासूनच उन्हाचे कडक चटके जाणवू लागतात. १० मेपर्यंत तापमान ४८ डिग्री सेल्सियसवर पोहोचण्याचा अंदाज येथील हवामान अभ्यासक प्रकाशभाई पारेख यांनी वर्तवला आहे. 
 
रेडिएटरला लागली होती आग : खामगावआगाराच्या खामगाव ते अकोला विना थांबा बसच्या रेडिएटरला अचानक आग लागली होती. मे रोजी नांदुरा रोडवरील लाबेला हॉटेल मागील गवताला आग लागली होती. उन्हामुळे अशा आगीच्या घटना घडत आहेत. 
 
तापमान मापक यंत्र हवे 
-शहराचे तापमान अधिक आहे. तापमानाची माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तापमान मापक यंत्र बसवण्यासाठी नागरिकांनी बाध्य केले पाहिजे. यंत्राची मागणी झाली असेल, तर ती पूर्ण करावयास पाहिजे.'' प्रकाश पारेख, हवामान तज्ज्ञ. 
बातम्या आणखी आहेत...