आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर विदर्भाचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई तीव्र केली नाही, तर केव्हाही विदर्भाचा वाळवंट होऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम आपण, आपले कुटुंबीय आप्तस्वकीय यांना संघटित करा. विदर्भाचे तुणतुणे सतत वाजवत राहा, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषद झाली. या वेळी उद््घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप होते. या वेळी महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे, राम नेवले, माजी आमदार हरिदास भदे, अरविंद देशमुख, अॅड. नंदा पराते, मंदाताई देशमुख, संध्याताई इंगोले, सुधाताई पावडे, वाशीम जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन अमदाबादकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, अरुण केदार यांची उपस्थिती होती.

विदर्भाचा ऐतिहासिक लढा श्रद्धेय ब्रजलाल बियाणी लोकनायक बापूजी अणे यांनी अकोल्यातूनच सुरू केला होता म्हणून परिषदेसाठी या ठिकाणाची निवड केल्याचे सांगून डॉ. खांदेवाले म्हणाले, समृद्धी असलेल्या बऱ्याच बाबी पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी लुटल्या. आम्ही गफलत केली, तर धानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेला पूर्व विदर्भही वाळवंट होऊ शकतो. नव्याने येऊ घातलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पांमुळे हे होणार आहे. त्यामुळे वेळीच जागृत व्हा, विरोधाची धार अधिक तीव्र करा, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये स्फुलिंग चेतवले. उर्वरित.पान
अॅड.नंदा पराते यांनी महिलांचा सहभाग वाढवल्याखेरीज हा लढा पुढे नेता येणार नाही, असे म्हणत आपापल्या घरातील आया-बहिणींचा सहभाग वाढवा, असे आवाहन केले, तर अरुण केदार यांनी भाजपची खेळी उघड करत विदर्भासाठीचा आवाज दिल्ली, मुंबईत बसलेल्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कृती करा, असा आग्रह धरला. या वेळी हरिदास भदे, प्रशांत गावंडे, राम नेवले, प्रकाश पोहरे आदींचीही भाषणे झालीत.

सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले, तर आभार सतीश देशमुख यांनी मानले. प्रारंभी नितीन रोंघे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशद्वारे विदर्भाच्या सक्षमतेची मांडणी केली. अरविंद देशमुख यांनी स्वागतपर भाषण केले, तर मनोज तायडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली. या वेळी युवा आघाडीचे डॉ. मनीष खंडारे, समाधान कनेकर, प्रदीप धामणकर, मनोज तायडे, शिवरतन जाजू, विलास ताथोड, रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, गौरखेडे, तापडिया उपस्थित होते.

अशी पुढे सरकली परिषदेची कारवाई : पॉवरप्वाइंट प्रेझेंटेशननंतर दीप प्रज्वलनाने परिषदेची कारवाई सुरु झाली. त्यानंतर तीन सत्रांसाठीची परिषद उपस्थितांसाठी खुली झाली. पहिल्या सत्रात डॉ. मनीष खंडारे, निखील गवळी, डॉ. निलेश पाटील, प्रदीप धामणकर, डॉ. दीपक मुंडे यांनी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात मुख्य अतिथींसह विदर्भाच्या निरनिराळ्या जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांनी आपापली मते मांडली. शेवटच्या सत्रात सर्वसम्मतीने ठराव पारित केले गेले.

तगडा पोलिस बंदोबस्त : विदर्भाचीबाजू मांडताना अॅड. श्रीहरी अणे यांना अलिकडेच एका कार्यक्रमात शाई फेकीचा सामना करावा लागला होता. ती पार्श्वभूमी लक्षात घेता आजच्या कार्यक्रमस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिषदेचे स्थळ असलेल्या प्रमिलाताई ओक हॉलच्या प्रवेशाद्वारापासून ते मुख्य मंचापर्यंत पोलिस तैनात होते. पोलिस अधिकाऱ्यापासून ते हवालदार, शिपाई असे सर्वच घटक बंदोबस्तात समाविष्ट होते.

पारित केलेले सात ठराव
{वेगळे राज्य राज्यघटनेच्या अनुच्छेद तीननुसारच व्हावे, त्यासाठी सार्वमताची अट घालू नये.
{ राज्याची निर्मिती संसदेचे काम आहे, त्यामुळे संसदेने हे कार्य विनाविलंब पूर्ण करावे.
{ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला तरुणांचे मजबूत संघटन तयार करणे.
{ गेल्या काही वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भातील शेती उद्योगधंदे बुडाले. त्याची भरपाई म्हणून वेगळा विदर्भ लवकर घोषित करा.