यवतमाळ - विदर्भवीर माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी यवतमाळपासून काही अंतरावर असलेल्या पिप्री लासिना या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लाेक बहुसंख्येने उपस्थित हाेते.
वेगळ्या विदर्भाचे कट्टर समर्थक माजी खासदार धोटे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शनिवारी दिवसभर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी झाली हाेती. वाघापूर नाका परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात अाले हाेते.
रविवारी सकाळी तिथूनच अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पिप्री लासिना येथील शेतात धाेटे यांना समाधी देण्यात आली. ‘भाऊ जांबुवंतराव धोटे अमर रहे’च्या घोषणांनी या वेळी आसमंत दुमदुमून गेला होता.
दरम्यान, अंत्यसंस्कार झाल्यानंतर शोकसभा घेण्यात आली. या वेळी कीर्ती राऊत, मुकुल वासनिक, रामदास तडस, रणजित देशमुख, कमलाताई गवई, संदीप बाजोरिया, विलास मुत्तेमवार यांनी शोक व्यक्त केला. त्यासोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी विजयाताई धोटे यांच्यासाठी पाठवलेला शोकसंदेश या वेळी विलास मुत्तेमवार यांनी वाचून दाखवला.
जांबूवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजता यवतमाळ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्या पिंपरी लासिना या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला- सुधीर मुनगंटीवार
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला असल्याची भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्ती केली आहे.
मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बघता त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आपल्याला ठळकपणे दिसतो. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी सतत संघर्ष केला. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होत त्यांनी नेहमीच निर्धाराने निक्षून त्यांची बाजु जनतेच्या दरबारात, विधिमंडळात, संसदेत मांडली. एक सर्जनशील कलावंत त्यांच्यात दडला होता. अशा या थोर बहुआयामी नेत्याच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
अशी झाली होती करियरला सुरुवात...अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात धोटे यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला होता. पण त्यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडले. पुढे यवतमाळच्या नगर परिषद शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून करिअरला सुरूवात केली. तत्कालीन आमदार व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब घारफळकर यांच्या माध्यमातून त्यांना ही नोकरी मिळाली होती.
शिक्षकाची नोकरी सोडून राजकारणात केला प्रवेश...
धोटे यांनी अल्पावधीतच नोकरीला रामराम केला. जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध यवतमाळच्या नगर परिषद वॉर्ड क्रमांक 12 मधून त्यांनी निवडणूक लढवली. दर्डांचा पराभव करून राजकीय मैदानात काँग्रेसचा विरोधक म्हणून उडी घेतली होती.
या बलाढ्य नेत्याला सळो की पळो केले...
जांबुवंतराव धोटे यांची ही उडी राजकीय किरकिर्दीत अत्यंत मोलाची ठरली. पुढे त्यांनी वसंतराव नाईकांसारख्या 11 वर्ष मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या बलाढ्य नेत्याला सळो की पळो करून सोडले होते. अल्पावधितच जांबुवंतराव हे नाव लोकांच्या हृदयावर कोरले गेले.
पुढील स्लाइडवर वाचा... धोटे यांचा पेहराव पांढरे शुभ्र एकटांगी धोतर,बंगाली सदरा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)