आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठ्यास मारहाण; तलाठी संघटना पोलिस ठाण्यामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नाल्याच्याकामावरून तलाठी आणि बाभुळगाव येथील काही लोकांमध्ये वाद झाला. त्यानंतर तीन ते चार जणांनी तलाठी यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी तलाठी यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर तलाठ्याच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तलाठ्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

बाभुळगाव येथील तलाठी पी. पी. लांडगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लांडगे हे त्यांच्या कार्यालयातून सोमवारी सकाळी ११ वाजता वनराई बंधाऱ्यांच्या कामानिमित्त निघाले होते. या वेळी त्यांना विठ्ठल प्रल्हाद वक्टे यांनी नाल्याबाबतचा अहवाल बदलून मागितला. या अहवालांवर त्यांनी सही शिक्का देण्याचा आग्रह केला. मात्र, याबाबतचा अहवाल पूर्वीच तहसीलदार यांना देण्यात आल्याचे लांडगे यांनी सांगितले. त्यानंतरही लांडगे यांच्याशी त्यांनी वाद घातला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या भीतीने लांडगे हे शेजारीच असलेल्या सेतू केंद्रात जाऊन बसले. या ठिकाणी सेतू मालक प्रदीप देशमुख हजर होते. विठ्ठल वक्ते हे त्या ठिकाणाहून जाऊन थोड्या वेळाने पुन्हा काही मुले घेऊन परत आले. यात किशोर श्रीराम गावंडे आणि रणजीत विठ्ठल वक्ते यांच्यासह तीन जण होते. त्यांनी त्यांना शिवीगाळ करून खाली पाडले लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी झालेल्या अवस्थेत लांडगे हे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून अकोला तालुका आणि मूर्तिजापूर तालुक्यातील तलाठी पोलिस ठाण्यात जमा झाले होते.

तर तक्रारदार जाणार होते एसपींकडे
तक्रारदारपोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांच्या समर्थनार्थ १०० ते १२५ तलाठी पोलिस ठाण्यात जमा झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी ठाणेदारांनी आपला लाचलुचपत खात्यातील पूर्वानुभव सांगण्यास सुरुवात केली. तुम्ही सर्वात जास्त लाच स्वीकारण्यात आघाडीवर आहात, असे म्हटल्यावर काही तलाठी संतप्त झाले आणि एसपींकडे तक्रार देण्यासाठी निघाले होते. मात्र, ठाणेदारांचाही उद्देश त्यांना नाउमेद करण्याचा नव्हता हे दिसून आल्यामुळे तलाठी शांत झाले. बाभुळगाव येथील तलाठ्याच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तलाठ्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.