आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडगावच्या शाळेतील शिक्षकच गैरहजर; शिक्षण सभापतींनी केली पाहणी; चाैकशी हाेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषदेच्या वडगाव येथील शाळेची सभापती पुंडलिकराव अरबट यांनी अचानक पाहणी केली. शाळेत दाेन शिक्षक गैरहजर असल्याचे अाढळून अाले. हजेरी पुस्तिकेवर अाॅगस्टपासून दाेन शिक्षकांच्या स्वाक्षऱ्याच नव्हत्या. या प्रकरणी सभापती शिक्षण विभागाला चाैकशीचा अादेश देणार अाहेत. 
 
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील बेताल कारभार यापूर्वी अनेकदा उजेडात अाला. शालेय पाेषण अाहार वितरणाबाबत तर माहिती सादर करण्याच्या सूचना सभापतींनी अनेकदा समितीच्या सभांमध्ये दिल्या. मात्र माहिती मिळाल्याने सभापतींनीच अनेक शाळांची पाहणी केली हाेती. या पाहणीदरम्यान पाेषण अाहारातील घाेळ, शिक्षक गैरहजर असणे असे प्रकार उजेडात अाले हाेते. 
दरम्यान, सभापती यांनी दाेन दिवसांपूर्वी वडगाव येथील शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत पाेषण अाहार व्यवस्थित अाढळून अाला. मात्र शिक्षक या वेळी गैरजहर हाेते. जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा घसरत असल्याने पालकवर्ग खासगी शाळांकडे वळत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असताना शाळेतील शिक्षकच गैरहजर राहत असतील तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार तरी कसा हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे शाळेत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 
 
अावार भिंतीसाठी शिक्षकांनी केली वर्गणी : वडगावयेथील जिल्हा परिषद शाळेच्या अावार भिंतीसाठी पाच शिक्षकांनी प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये जमा केले. या वर्गणीतून अाता शाळेची अावरभिंत बांधण्यात येणार अाहे. त्या अनुषंगाने भूमिपूजनही करण्यात अाले. शिक्षकांच्या या सामाजिक दातृत्वाचे सभापतींनी काैतुक केले. 
 
वडगाव जि.प.शाळेची पाहणी करताना शिक्षण सभापती अरबट. 
 
चाैकशी हाेणार 
- वडगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक हजर नसल्याचे अाढळून अाले. याबाबत पुढील अाठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात येईल. पुंडलिकराव अरबट, सभापती, शिक्षण अर्थ समिती. 
 
एकाच खाेलीमध्ये भरवतात तीन वर्ग 
वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग अाहेत. मात्र एकाच खाेलीत तीन, तर दाेन खाेल्यामध्ये दाेन-दाेन वर्ग भरल्याचे दिसून आले. दाेन शिक्षकांच्या हजेरी बुकावर अाॅगस्टपासून स्वाक्षरीच नव्हत्या. शिक्षकांचा सुटीचा अर्जही नव्हता. त्यामुळे गैरहजर असलेल्या शिक्षकांच्या वर्गाला काेणी शिकवले, हा प्रश्न उपस्थित झाला. 
बातम्या आणखी आहेत...