आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतेरा लाखांचा खर्च महिन्याला ‘कचऱ्यात’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील कचरा उचलण्याच्या निविदांना प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेने तूर्तास स्वत: कचरा उचलण्याचे काम सुरू केले असून, महिन्याकाठी १३ लाख २६ हजार ७३२ रुपये खर्च येत आहे. यासाठी २२ ट्रॅक्टर, ६६ कंत्राटी मजूर नियुक्त केले आहेत. मात्र, रविवारी कचरा उचलण्याच्या कामास सुटी दिल्याने दुसऱ्या दिवशी दोन दिवसांचा कचरा उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे शहराच्या काही भागांत लाखो रुपये खर्च करूनही कचरा तसाच साठलेला राहत आहे.
कचरा उचलण्याचे काम क्षितिज संस्थेला दिले होते. क्षितिज संस्थेचे कंत्राट फेब्रुवारी महिन्यातच संपुष्टात आले होते. परंतु, मनपा प्रशासनाने त्यापूर्वीच निविदा बोलावण्याकडे दुर्लक्ष केल्याने क्षितिज संस्थेला पुन्हा मुदतवाढ दिली. एकीकडे स्वत:च्या चुकीमुळे मुदतवाढ, तर दुसरीकडे कचरा उचलला गेल्यामुळे दंडात्मक कारवाई या प्रकारामुळे क्षितिज संस्थेने कचरा उचलण्याच्या कामास मुदतवाढ घेण्यास नकार दिला. यादरम्यान मनपाने कचरा उचलण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. डोअर टू डोअर कचरा संकलन करून तो शहराबाहेर नेण्याच्या अटीमुळे निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. तीन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाल्याने आता निविदाच बोलावल्या नाहीत.

तूर्तास मनपा स्वत: कचरा उचलण्याचे काम करत आहे. यासाठी एक हजार रुपये रोज या दराने २२ ट्रॅक्टर भाड्याने घेण्यात आले. प्रत्येक ट्रॅक्टरला दररोज तीन ट्रिप करण्यासाठी सहा लिटर डिझेल दिले जाते, तर कचरा उचलणे आणि डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याच्या कामासाठी ६६ कंत्राटी मजूर नियुक्त केले आहेत. या मजुरांना प्रत्येकी दहा हजार मानधन दिले जाते. यासाठी महापालिकेला महिन्याकाठी १३ लाख २६ हजार, तर वर्षाकाठी एक कोटी ५९ लाख रुपये खर्च करावे लागतात. एकीकडे हा खर्च करतानाच ७४० कायम आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही मनपाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. रविवारी कचरा उचलण्याचे काम केले जात नाही. दिवसाकाठी १३० टन कचरा साचतो. एक दिवस कचरा उचलण्याचे काम बंद राहत असल्याने दुसऱ्या दिवशी २५० टनपेक्षा अधिक कचरा साचला जातो.

तात्पुरती व्यवस्था
^कचराउचलण्याची ही व्यवस्था तात्पुरती आहे. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर पुढील कार्यवाही होईपर्यंत ही व्यवस्था सुरू राहील.'' सुरेश पुंड, सहायकस्वच्छता अधिकारी

अभियंत्यालाही दहा हजार रुपये मानधन
मनपात अभियंत्यांसह विविध तांत्रिक पदांवर मानसेवी कर्मचारी कार्यरत आहेत. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना महिन्याकाठी दहा हजार मानधन दिले जाते, तर दुसरीकडे अभियंता म्हणून १२ तासांपेक्षा अधिक वेळ जिकिरीचे महत्त्वाचे काम करणाऱ्यांनाही दहा हजार मानधन दिले जाते.

मुहूर्त केव्हा? : कंटेनरसहकचरा संकलन तसेच कचरा उचलण्यासाठी विविध वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला आहे. महासभेत प्रस्ताव मंजूर होऊन अनेक दिवसांचा कालावधी झाला असताना अद्यापही मनपाने कंटेनरची खरेदी केलेली नाही.

कंटेनर, कचराकुंड्यांची कमतरता
मनपाने २००२ ला कंटेनर खरेदी केले होते. त्यानंतर महापालिकेने कंटेनर खरेदी केलेले नाहीत. खरेदी केलेले कंटेनर आता नष्ट झाले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत कचरा टाकण्यासाठी कंटेनरही नाहीत तसेच कचरा कुंड्याही नाहीत. त्यामुळे कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होतो.