आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पट्टी वसुलीसाठी आता ‘अॅक्शन प्लॅन’ हाेणार तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अाकाेट ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेच्या वसुलीसाठी ‘अॅक्शन प्लाॅन’ अाखण्याचा निर्णय साेमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सरपंच ग्रामसेवकांच्या सभेत घेण्यात अाला. वसुलीसाठी पथके तयार करण्यासह इतरही उपाय याेजना करण्यात येणार अाहेत. सभा जि.प. अध्यक्षा संध्या वाघाेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे यांनी घेतली. 
 
अाकाेट ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेतून अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येताे. ही याेजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अर्थात मजीप्रातर्फे चालवण्यात येते. जिल्हा परिषदेने पाणी पट्टीची वसुली करुन याेजनेच्या देखभाल दुरुस्तीपाेटी दर महिना मजीप्राला १५.२५ लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वी झाला हाेता. या याेजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे ८५ टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण हाेणार अाहेत. 

दरम्यान, साेमवारी सरपंच, ग्रामसेवक , बीडीअाेंच्या सभेत पाणी पट्टी वसुलीचे नियाेजन करण्यात अाले. सभेला शिक्षण अर्थ समितीचे सभापती पुंडलीकराव अरबट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काेपुलवार उपस्थित हाेते. 

तर ग्रामसेवक सरपंचावर कारवाई : पाणीपट्टीची वसुली झाल्यास ग्रामसेवक अणि प्रसंगी सरपंचावरही कारवाई हाेईल, असा इशारा सीईअाे विधळे यांनी दिला. वसुलीसाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न हाेणे अावश्यक अाहे. पाणी असूनही ते नियाेजनाअभावी ग्रामस्थांना मिळणे चूक अाहे. सभेनंतर सर्व ग्रामसेवक अाणि बीडीअाेंनी वसुलीचे नियाेजन करा, असेही सीईअाेंनी निर्देश दिले. 

सीईअाेंनीबीडीअाे, सरपंच, ग्रामसेवकांना धरले धारेवर : पाणीपट्टी वसुलीबाबत सीईअाे अरुण विधळे यांनी बीडीअाे, सरपंच, ग्रामसेवकांना धारेवर धरले. पाणी पट्टी वसुलीसाठी गावातीलच कंत्राटी कर्मचारी नेमल्यास ते काेणाचे एेकणार नाही, असे एक सरपंच म्हणाले. यावर सीईअाेंनी एेकत नसल्यास पद साेडा, असा शब्दात त्यांनी सरपंचाचा समाचार घेतला. एका ग्रामसेवकाने तर ग्रामस्थांकडे पैसेच नसल्याने वसुली थकल्याचे सांगितले. यावर सीईअाेंनी ‘अहाे ग्रामसेवक साहेब,तुम्ही ग्रामस्थांचे खिसे तपासले काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच करीत वसुलीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन काम करा, अशा शब्दात सीईअाेंनी ग्रामसेवकाला सुनावले. 

अकाेला : ११ काेटी ४३ लाख ४२ हजार ४५१ 
अाकाेट : काेटी ७९ लाख ४५ हजार १५९ 
बाळापूर : ७३ लाख ५९ हजार ३२२ 
तेल्हारा : २७ लाख २६ हजार ४०३ 

जिल्हा परिषद प्रशासनापुढे घर कर, पाणी कर, प्रादेशिक पाणी कर वसुली आव्हान उभे ठाकले अाहे. प्रादेशिक पाणी कर वसुली केवळ १.४० टक्के झाली अाहे. अकाेला येथील ०.५७ टक्के, अाकाेट-१.३२ अाणि तेल्हारा येथील १०.६० टक्के अाहे. थकबाकीचा तपशील पुढीलप्रमाणे अाहे.
 
असा अाहे वसुलीसाठी अॅक्शन प्लॅन  
१. प्रत्येक गट विकास अधिकारी विविध विभागातील ते कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणार अाहेत. 

२. अार्थिक वर्ष संपण्यापूर्वी ५० टक्के वसुलीचे लक्ष निश्चित करण्यात अाले अाहे. 
३. थकितदारांना डिमांड नाेटीस बजावण्यात येणार. 
४. वसुलीसाठी विविध स्तरावर जनजागृती करण्यात येईल. 
५. बीडीअाेंनी ग्रामसेवकांचे दप्तर तपासावे. ग्रामसेवकांनी किमान वसुली होईपर्यंत मुख्यालयी राहावे. 
६. पाणी पट्टी वसुलीसाठी दाेन ते तीन कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार अाहे. त्यांना वसुली केल्याने मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानातून वेतन देण्यात येईल. 
७. वसुलीसाठी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य सहकार्य करतील. 
८. वसुलीसाठी राेज अाढावा घेण्यासाठी ग्रामसेवक, बीडीअाेंचा व्हॉटसअॅप गृप तयार करण्यात येणार अाहे. या गृपवर राेज केलेल्या अाणि थकित राहिलेल्या रक्कमेची माहिती टाकावी लागणार अाहे. या गृपमध्ये सीईअाेंदेखील राहणार अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...