आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल संकट: एकाही लघु प्रकल्पात अर्धा दलघमी जलसाठा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पापैकी १९ लघु प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित लघू प्रकल्पात अर्धा दशलक्ष घनमिटर पेक्षाही कमी जलसाठा राहिला आहे. तर काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात दररोज घट होत आहे. पुढे पाऊस झाल्यास शहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईचा भिषण सामना करावा लागणार आहे. 

गेल्या काही वर्षापासून पावसाच्या हलगर्जीपणामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एक वर्ष पाऊस दोन वर्ष हुलकावणी असा पावसाचा खेळ सुरु आहे. यावर्षीही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील वान प्रकल्प वगळता मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा राहिला आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस हजेरी लावेल, असे वाटत होते. मात्र केवळ ढगाळ वातावरण अनुभवास मिळते. पाऊस मात्र होत नाही. या सर्व प्रकारामुळे प्रकल्प आटत चालले आहे. जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पांवर ग्रामिण भागाची मदार आहे. या ३२ लघू प्रकल्पापैकी १९ लघू प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा राहिला आहे. १९ वगळता लघू प्रकल्पातील जलसाठा असा, पिंपळगाव चांभारे ०.४२, पिंपळगाव हांडे ०.२५, सावरखेड ०.२५, इसापूर ०.३४, मोझरी ०.४७, कानडी ०.१५, घोंगा ०.१०, तुळजापूर ०.२५, झरंडी ०.३८, िहवरा ०.४९, शिवण खुर्द ०.४५, (साठा दलघमी मध्ये). यामुळे ग्रामिण भागाला पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. 

आठलघू प्रकल्पावर पाऊसच झाला नाही
३२ लघू प्रकल्पांपैकी पिंपळशेंडा, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, सावरखेड, इसापूर, झरंडी,हिवरा, विश्वमित्री या लघू प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात एक जून पासून पावसाची नोंदच झाली नाही. 

मोठ्या-मध्यम प्रकल्पातील साठा असा 
काटेपूर्णा १४.६९ दलघमी 
वान ४३.५४ दलघमी 
मोर्णा ६.८१ दलघमी 
उमा ०.०५ दलघमी 

कोरडे पडलेले प्रकल्प 
शहापूरबृहत, सुकळी, विश्वामित्री, दगडपारवा, तामसी, कसुरा, सावरगाव, गावंडगाव, बोरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, चिचपाणी, भिलखेड, धारूर, पिंपळशेंडा, जनूना,घोटा, मोऱ्हळ, हातोला हे लघू प्रकल्प कोरडे पडले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...