आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकर म्हणताहेत, अाम्हाला पाणी द्या हाे पाणी, महापालिकच्या प्रयोगात नागरिकांचे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काटेपूर्णा प्रकल्पातील शहरासाठी पाणी आरक्षणाची वाट पाहता तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या प्रयोगात नागरिक मात्र नाहक वेठीस धरले जात आहेत. या प्रयोगामुळे काही भागाला दहा ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नाही, तर काही भागाला पुन्हा पुन्हा पाणीपुरवठा होत आहे. या सर्व प्रकारामुळे नगरसेवकही वैतागले असून, सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याबाबत कोणाचीही नाराजी तसेच आक्षेप नसताना हा प्रयोग कशासाठी केला, असा प्रश्न अनेक नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील अंतर्गत पाणी वितरण प्रणाली विस्कळीत झाल्याने तसेच महान जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांचे आयुष्यमान संपल्याने आणि जलकुंभांच्या मोजक्या संख्येमुळे शहराला दररोज पाणीपुरवठा देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहराला चार, पाच अथवा सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षीही पावसाने दडी मारल्याने काटेपूर्णा प्रकल्पात ऑक्टोबर २०१४ च्या तुलनेने या वर्षी २६ टक्के जलसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी आरक्षणात शहरासाठी जुलै २०१६ पर्यंत जेवढे पाणी आरक्षित केले जाईल, त्या आरक्षित पाण्यावरच महापालिकेला नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. परंतु, आरक्षणाची वाट पाहता पाणीपुरवठा विभागाने तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगामुळे सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन उर्वरितपान
कोलमडले.भरीस भर महान जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे, तर कधी मुख्य जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण शहरातील पाणी वितरणाचे नियोजन कोलमडून पडले आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनाही नेमका कोणत्या भागाला पाणीपुरवठा होणार, याबाबत माहिती नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाण्यासाठी हाहाकार उडाला असून, प्रशासनाप्रति संताप व्यक्त केला जात आहे.

याभागाला दहा ते बारा दिवसांपासून पाणीपुरवठाच नाही : शहरातीलतापडियानगर, जठारपेठ, उत्तरा कॉलनी, निबंधे प्लॉट, मालीवाल गॅस गोडाऊन परिसर, प्रसाद कॉलनी, गुप्ते मार्ग, केला प्लॉट, ज्योतीनगर, राहुलनगर, मच्छिंद्रनगर, महाजनी प्लॉट, भागवत प्लॉट, रामनगरचा काही भाग, पत्रकार कॉलनी, आंबेडकरनगर, ताजनगर, लक्ष्मीनगर, हबीबनगर, शबनमनगर, खैर महंमद प्लॉट, फडकेनगर, साईनगर, वानखडेनगर, भगतवाडी, रेणुकानगर, गीतानगर, हमजा प्लॉट, गुलवाडे प्लॉट, भगीरथवाडी, गंगानगरचा काही भाग, बाजोरियानगरी, खदान, कमला जाजूनगर, संताजीनगर, जय हिंद चौक, अयोध्यानगर, पार्वतीनगर, तथागतनगर, मारोतीनगर, बिर्ला मंदिर परिसर, लाडीसफैल, शंकरनगर, विजय हाउसिंग सोसायटी, जोगळेकर प्लॉट, ज्ञानेश्वरनगर, गोंडपुरा, रमेशनगर, शिवाजीनगर, वाल्मीकीनगर आदी अनेक भागांना दहा ते बारा दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नाही.

विजेचा खेळखंडोबा सुरूच
महान जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. सोमवारी काही तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नियोजित भागांपैकी मंगळवारी काही भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तर मंगळवारीही विजेचा लपंडाव सुरू असल्याने बुधवारीही पाणी वितरणावर त्याचा परिणाम होणार आहे.
दूषित पाणीपुरवठा सुरूच
फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणीपुरवठ्याचा प्रकार अद्यापही सुरू आहे. उमरी भागात दूषित पाणीपुरवठा झाला असताना आता जुने शहर, मानेक टॉकीज परिसर आदी भागांतही दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे केल्या आहेत.
प्रयोग फसला

उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्याने शेवटच्या घटकाला पाणीपुरवठाच होत नाही. त्यामुळे हा प्रयोग फसला आहे. त्यामुळे ही नसती उठाठेव कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
करुणाइंगळे, नगरसेविका

महापालिकेचा प्रयोग चुकीचा
तांत्रिक अडचणी लक्षात घेता, हा प्रयोग करणे चुकीचे आहे. त्यासाठी प्रथम पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक बदल करणे गरजेचे होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सागरशेगोकार, माजी नगरसेवक

केवळ नियोजनाचा अभाव
कोणतेहीनियोजन करता, त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता, हा प्रयोग सुरू केला. यापूर्वी सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असताना कोणतीही अडचण नव्हती. अजयशर्मा, नगरसेवक
स्वत:चे हसू करून घेतले

सहादिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचा प्रयोग सुरू केला. हा प्रयोग फसल्याने या विभागाने स्वत:चे हसू करून घेण्यासारखेच आहे. सुमनताईगावंडे, माजी महापौर

जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा बंद झाला अाहे.
अनेक भागांत दहा ते बारा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. आज पाणीपुरवठा होणार, उद्या होणार, असे केवळ चॉकलेट पाणीपुरवठा विभागाकडून दाखवले जात आहे. प्रत्यक्षात पाण्याचा थेंबही नागरिकांना मिळालेला नाही. हा प्रयोग त्वरित बंद करावा.- निकहतशाहिन अफसर कुरेशी

चॉकलेट दाखवण्याचा प्रकार
पाण्याचा पुन्हा अपव्यय

रिलायन्सकंपनीचे केबल टाकताना अब्दुल हमीद चौक ते शिवाजी कॉलेज या मार्गावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. एकीकडे अनेक भागांना पाणीपुरवठा झालेला नसताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय सातत्याने सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यास पाणीपुरवठा विभागाला अद्यापही यश आले नाही.