आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवनिर्मित पाणीटंचाईचे संकट शहरावर ओढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी खोल गेल्याने तीन पंपांपैकी एक पंप तीन तासांनंतर आळीपाळीने बंद ठेवावा लागत आहे. या तांत्रिक कारणामुळे जलकुंभ भरण्यास विलंब होत आहे. प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेता, सहा दिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा तीन चार दिवसांआड करण्याचा निर्णय आता पदाधिकारी आणि प्रशासनाला भोवण्याची शक्यता आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने शहराला मानवनिर्मित पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी प्रकल्पात २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. मागील वर्षी पावसाने सरासरी गाठल्याने काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळेच नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या पाणी आरक्षणाच्या बैठकीत काटेपूर्णा प्रकल्पातून खांबोरा योजनेला पाणी सोडल्यानंतर उर्वरित पाण्यापैकी सिंचनासाठी पाणी सोडता अकोला पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षित पाणी १५ जुलैपर्यंत पुरवणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ १५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असताना तसेच लहरी निसर्गाचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, सहा दिवसांआड पाणीपुरवठाऐवजी काही भागाला तीन तर काही भागाला चार दिवसांआड सुरू करण्याचा धाडसी तेवढाच अंगलट येणारा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. विशेष म्हणजे सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असताना नागरिकांची तसेच नगरसेवकांची पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याची कोणतीही मागणी नव्हती. पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा एप्रिल अथवा मे महिन्यात फटका बसू शकतो, याबाबत "दिव्य मराठी'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले.
परंतु, पाणीपुरवठा विभागातील स्वत:ला ‘जलतज्ज्ञ’ समजून प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे, कोणताही ‘लोड’ घेण्याचे कारण नाही, असे प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना सांगून या निर्णयात बदल केला नाही. परंतु, आता प्रकल्पातील जलसाठा कमी झाला आहे. त्यातच ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता प्रकल्पात केवळ पाच दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहिले आहे. प्रकल्पातून जलशुद्धीकरण केंद्रात ग्रॅव्हिटीने पाणी घेतल्या जाते. जलसाठा कमी झाल्याने उच्च दाबाने पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचत नाही. त्यामुळे तीन पंप सुरू ठेवले तरी पाण्याची उचल करता येत नाही. यामुळे पूर्वी २४ तास तीन पंप सुरू ठेवून प्रती तास २७ लाख लीटर उचल केली जात होती. परंतु, आता दर तीन तासांनी तीनपैकी एक पंप बंद करावा लागतो. त्यामुळे आता दर तासाला २७ लाख, १८ लाख, २७ लाख लीटर अशी पाण्याची उचल केली जाते. त्यामुळे जलकुंभ भरण्यास विलंब होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना विस्कळीत पाणीपुरवठा होतो. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दोन जलकुंभ बंद करून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. म्हणजेच पुन्हा सहा दिवसांआड पाणीपुरवठा केल्यासच नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हमनहीं सुधरेंगे : प्रकल्पातीलजलसाठा कमी झाल्याने बंद करावा लागणारा पंप, जलकुंभ भरण्यास होणारा विलंब, या सर्व बाबी लक्षात घेऊनही अद्यापही पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा पाच दिवसांआड अथवा सहा दिवसांआड करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
पाणीपुरवठाविभाग काटेपूर्णा प्रकल्पातील मृतसाठ्यावर डोळा ठेवून आहे. परंतु, काटेपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा ११ दशलक्ष घनमीटर असला तरी यात सहा दशलक्ष घनमीटर गाळ साचला आहे. याकडेही अधिकाऱ्यांनी हम नहीं सुधरेंगेची भूमिका घेत दुर्लक्ष केले आहे.
लावलेलीसवय जड जाणार : सहादिवसांआड पाणीपुरवठा होत असताना नागरिकांची ओरड नव्हती अथवा मागणी नव्हती. परंतु, पाणीपुरवठा विभागाने ही सवय तोडून तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा देण्याची सवय लावली. आता पुन्हा पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना पाणीपुरवठा विभागाला करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. बाष्पीभवनाची टक्केवारी ४० पेक्षा अधिक होते तसेच ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला आणखी पाणी सोडावे लागण्याची शक्यता लक्षात घेता, मे महिन्यात धरणातील पाण्याची लेव्हल आणखी खाली जाणार आहे. त्यामुळे चार दिवसांआड पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

उचल - त्यामुळेआता दर तासाला २७ लाख, १८ लाख, २७ लाख लीटर अशी पाण्याची उचल केली जाते.
विलंब- त्यामुळे जलकुंभभरण्यास विलंब होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना विस्कळीत पाणीपुरवठा होतो.