आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाने घोषणा करूनही अद्याप सवलतींचा दुष्काळ सर्वत्र कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्यशासनाने दुष्काळ जाहीर करून आज दीड महिना उलटला तरी अद्याप जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ५५ गावांमध्ये सवलतीचा लाभ देण्यात शाळा, बँका, वीज वितरण कंपनीकडून दिरंगाई केली जात आहे. यामुळे हजारो नागरिकांना सवलतीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ऑक्टोबरपासूनच दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या होत्या. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत प्रशासनाने दुष्काळ घोषित केला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सन २०१५-१६ या वर्षातील खरीप हंगामातील खरीप पिकांची नजर अंदाज हंगामी पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा कमी आहे, अशा ५५ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तेल्हारा बाळापूर तालुक्यांतील २०९ गावांपैकी ५५ गावांमध्ये सवलती देण्याचे निर्देश दिले आहेत. २३ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असतानाही या आदेशाकडे संबंधितांकडून कानाडोळा करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील लाभार्थी सवलतीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. एकप्रकारे शासन निर्णयालाच जिल्ह्यात हरताळ फासण्यात आली आहे. अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई असताना गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप या गावातील पाणीटंचाई निवारणार्थ पाऊल उचलले नसल्याचे दिसून येते.
५०पैशांच्या आत पैसेवारी असलेली गावे :
तेल्हारा तालुका - भांबेरी, खापरखेड, वरूड बु., राणेगाव, जस्तगाव, पाथर्डी, टाकळी, अटकळी, चापानेर, निंबोळी, निंभोरा बु., निंभोरा खुर्द, तळेगाव पातुर्डा, बाभुळगाव, वांगरगाव, मनाली बु., बाभुळगाव, तळेगाव प्र. वडनेर, डवला, पिवंदळ बु., आडसूल, उमरी, खेल देशपांडे, उबारखेड, बांबर्डा खुर्द, खाकटा, मनाली खुर्द, नेर, सांगवी, पिवंदळ, नरसीपूर, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी, खेल मुकर्दम, मनब्दा, दापुरा

- बाळापूर तालुका - काजीखेड, वझेगाव, जानोरी मेळ, स्वरूपखेड, हिंगणा शिकारी, हिंगणा आडसूळ, मोखा, नागद, हिंगणा निंबी, निंबा, बहादुरा, मालखेड, भोरटेक, कवठा, अंत्री, डोंगरगाव, लोहारा, दगडखेड, सांगद

टँकरही कागदावरच : यागावांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून पाण्याचे टँकरसुद्धा मोजूनच पाठवण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींनी पंचायत समिती तहसील कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावावर कोणतीही कारवाई अद्याप झाली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही गटविकास अधिकारी दखल घेण्यास तयार नाहीत.

फीसवलतीत नाही सूट : दुष्काळीपरिस्थिती असल्याने शैक्षणिक फी सवलतीत सूट देण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकाही शाळेने स्वत:हून पुढे येऊन विद्यार्थ्यांना फी परत दिली नाही. तहसीलदारांनी पुढाकार घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने सूचना देणे गरजेचे झाले आहे.
चाऱ्याची कमतरता : अनेकगावांमध्ये जनावरांना पिण्याचे पाणी चारा नाही. अशा परिस्थितीत चारा छावण्या लावल्या नाहीत. उलट जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर तुपकर यांनी चाराटंचाई नसल्याची माहिती प्रशासनाला कळवली आहे.

- तेल्हाऱ्यातील तळेगाव,जाफ्रापूर, उकळी बाजार अकोटमधील जळगाव नाहाटच्या बोअर अधिग्रहणांना मान्यता दिली अाहे.'' शैलेश हिंगे, उपविभागीयअधिकारी, अकोट
- स्थायी समितीसभेत हा प्रश्न उचलून धरला होता. वीज जोडणी पंपाच्या वर्कऑर्डरही दिल्या. मात्र अद्याप ते लावून दिले नाहीत. शिक्षण संस्थांनीही अद्याप फी माफी केलेली नाही. '' शोभाताई शेळके, जि.प.सदस्य
- ज्या गावातीलनागरिकांनी टँकरची मागणी केली होती. त्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन तत्पर आहे. '' सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारीअभियंता पाणीपुरवठा

- तालुक्यात तीव्रपाणीटंचाईचे सावट आहे. अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केल्यानंतर वास्तव समोर येवू शकते. केवळ कार्यालयात बसून अहवाल देणे योग्य नाही.'' विजयकुमार लव्हाळे, जिल्हापरिषद सदस्य

अशा मिळतील सवलती​
जमीन महसुलात घट
कृषिपंपाच्याचालू वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट
शालेय,महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी टँकर्सचा पुरवठा
शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करणे
बातम्या आणखी आहेत...