आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींच्या कामांना दिली प्रशासकीय मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शासन निधीतील सुचवलेल्या विविध ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या कामांना अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या महिन्याच्या अखेरीस जलशुद्धीकरण केंद्रात सहा पंप मोटार बसवली जाणार असतानाच दुसरीकडे अंतर्गत वितरण प्रणालीत सुधारणा होण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
तत्कालीन राज्य शासनाने २०१४ ला महापालिकेला विविध विकासकामांसाठी २६ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून अद्यापही कामे सुरू आहेत. याच निधीतून तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अकोला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी महासभेकडून मंजूर करून घेतला होता. परंतु, मंत्रालयात अनेक बैठका झाल्यानंतरही मजिप्राने अकोला पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे कोट्यवधींच्या निधीतून नेमकी कोणती कामे घ्यावी? असा प्रश्न निर्माण झाला होता. सत्ताधारी गटातील एका गटाने यातून शहरात विकासकामे करण्याची, तर दुसऱ्या गटाने या निधीतून पाणीपुरवठा विभागातील कामे घ्यावीत, अशी मागणी केली होती. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने अंतर्गत वितरण प्रणालीत येणाऱ्या अडचणी नमूद करून पाणी वितरण प्रणाली सुरळीत होण्यासाठी विविध कामे सुचवली होती. ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी महासभेत हा विषय लावून धरला होता. त्यामुळे ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा विभागातील विविध कामांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु, ही कामे प्रशासकीय मंजुरीमुळे रखडली होती. आता मंजुरी मिळाल्याने विविध कामांचा मार्ग मोकळा झाला. लवकरच निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Áअंतर्गत वितरण व्यवस्था झोनसाठी जलवाहिन्या टाकणे - कोटी लाख रुपये.
Áजलकुंभ परिसरात वॉल कम्पाउंड - कोटी लाख रुपये.
Áजलकुंभावर फ्लो मीटर बसवणे - कोटी लाख रुपये.
Áजलशुद्धीकरण केंद्रातील सर्व प्रकारच्या दुरुस्त्या, गॅस युनिट, इमारत दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती - कोटी ६९ लाख रुपये.