आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाणी पुरवठ्या’चे विद्युत बिल थकले; 74 गावांवर जलसंकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - वीजभारनियमनामुळे शहरवासीयांना आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता १० दिवसांवर गेला आहे. तर खामगाव तालुक्यातील तब्बल ७४ गावातील पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकीत असल्याने भर पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. अनेक गावातील महिलांना डोक्यावर हंडे घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. 
 
खामगाव शहराला गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. गेरु माटरगाव येथे महावितरण तर्फे २६ सप्टेंबर पासुन पहाटे ५.३० ते सकाळी ८.३०, सकाळी ११.३० ते दुपारी २.४५ सायंकाळी ते रात्री १० या वेळात तीन टप्प्यात तास १५ मिनिटे भारनियमन करण्यात येत अाहे. गेरु माटरगाव पासुन शहरातील घाटपुरी टाकी वामननगर टाकी भरण्यासाठी तब्बल तासाचा कालावधी लागतो. कधी कधी मधातच पाणी पुरवठा होणारी पाईपलाईन फुटते. या फुटलेल्या पाईपलाईन बाबत अन्य महत्वाच्या कारणासाठी गेरु माटरगाव येथील धरणावर बसविलेला तरंग सेवेचा दुरध्वनी लागत नाही. यामुळे गेरु माटरगाव येथील भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी नगर पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 

तर दुसरीकडे तालुक्यातील ११८ गावातील पाणी पुरवठा योजनेला महावितरण करवी वीज पुरवठा देण्यात आला आहे. या गावातील ग्रामपंचायती कडून पाणी पुरवठा योजनेला महावितरण करवी वीज पुरवठा देण्यात आला आहे. या गावातील ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा वीज बिलापोटी महावितरणचे 2 कोटी ३८ लाख रुपये थकले होते. त्यापैकी २३ ग्रामपंचायतीने पैशाची जुळवाजुळव करीत 5 लाख ८९ हजाराची रक्कम भरली. यामुळे या गावांचा खंडीत करण्यात आलेला वीज पुरवठा पुन्हा जोडण्यात आला. मात्र ७४ ग्रामपंचायतीने एकुण 1 कोटी ८३ लाखाची रक्कम थकवली आहे. त्यामुळे या गावांचा वीज पुरवठा गेल्या १५ ते २० दिवसापासुन तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही. बहुतांश गावातील लोकांकडून संबंधित ग्रामपंचायतीने पाणी पट्टी कराची वसुली केली नाही. तर काही गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कर पाणी पट्टी कराची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीच्या जवळ पैसा उरला नाही. त्यामुळे थकीत बिल राहिल्याने वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. 
 
आदेशाची होते अंमलबजावणी 
वरिष्ठकार्यालयाकडून ज्या प्रमाणे वीज भारनियमनाचे आदेश येतात. त्याप्रमाणे दररोजचे वीज भारनियमन करण्यात येत आहे. आणि वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येताच वीज पुरवठा सुरू करण्यात येतो. 
- पी.टी. बहुरुपे, सहाय्यक अभियंता, राेहणा उपकेंद्र 
 
नगर पालिकेला सूचना देण्यात आली नाही 
महावितरणतर्फे २६ सप्टेंबर रोजी गेरु माटरगाव येथे भारनियमन करण्यात आले. परंतु त्यानंतर भारनियमन झाले नाही भारनियमनाबाबत नगर पालिका महावितरणकडून सुचना देण्यात आली नाही. 
- सतीष आप्पादुडे, सभापती, पाणी पुरवठा, न. प. खामगाव 
 
पाणी पुरवठा सुरळीत झाल्यास आंदोलन 
अंत्रज गावाचा पाणी पुरवठा सप्टेंबर पासून खंडित आहे. सरपंच सचिवांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिव हे आठवड्यातून दोनदाच येतात. त्यामुळे वसुलीला ब्रेक लागला. आता पाण्यासाठी अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 
- श्रीकृष्ण आत्माराम गायकी, सदस्य, अंत्रज 
 
पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तात्पुरता बंद 
महावितरणकार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार भास्तन, सगोडा, कालखेड, चिंचखेड, कठोरा, मच्छिंद्र खेड, माक्ता कोक्ता, मोरगाव, पारखेड, सुजातपुर, मोरगाव डिग्रस, तांदुळवाडी, पोरज, बेलखेड, भेंडी, जळका भडंग, काळेगाव, कुंबेफळ, बोर जवळा, वसाडी, माळेगाव गोंड, धानोरा, टाकळी तलाव, तरोडा डी, हिंगणा, जवळा आवार, लोणी गुरव, कदमापूर, पळशी खुर्द, चितोडा, वझर, नांद्री, दिवठाणा, नागापूर, कोंटी, वरणा, घारोड, किन्ही महादेव, अंत्रज, गणेशपूर, कंझारा, गारडगाव, खुटपुरी, शिरजगाव देशमुख, चिंचपूर, लाखनवाडा, पेडका पातोंडा, दधम, पिंप्री कोरडे, लाखनवाडा बु. यासह ७४ गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...