आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार! पाणी घेऊन जाणारा आढळल्यास तुमचेच निलंबन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सुरळीतपणे सहा दिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आता जलकुंभावरून पिण्यापुरते पाणी देण्यासही मज्जाव घातला आहे. जलकुंभ परिसरातून पाणी घेऊन जाणारा व्यक्ती आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून टाकेन, अशी सूचना वजा धमकीच साहेबांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीही वैतागले आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तांत्रिक अडचणी दूर करता तीन ते चार दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. नगरसेवक अथवा नागरिकांची कोणतीही मागणी नसताना केवळ स्वत:च्या हट्टापोटी सुरू केलेला हा प्रयोग उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागावरच बुमरँग होण्याची शक्यता आहे. या प्रयोगामुळे पाणी पळवण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. परंतु, अद्यापही ‘मेरी मर्जी’सुरूच आहे. या प्रयोगानंतर आता जलकुंभावरून पिण्यापुरते पाणी नेण्यासही कार्यकारी अभियंत्यांनी मज्जाव घातला आहे. काही जलकुंभांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना जलकुंभावरून पाणी घेऊन जाणारा व्यक्ती आढळल्यास निलंबित करण्याची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर जलकुंभावर कोणी पाणी प्यायलाही येता कामा नये, अशी सूचनाही कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे. या धमकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कर्मचाऱ्यांनी जलकुंभावरील नळजोडण्याच काढून टाकल्या आहेत, तरीही व्हॉल्व्हमधून गळणारे पाणी दोन लीटर कॅनमध्ये घेण्यासाठी नागरिक येतच आहेत. परंतु, साहेबांच्या धमकीपायी जलकुंभावरील कार्यरत कर्मचारी पाणी देता थेट सर्वसामान्य नागरिकांना हाकलून लावत आहे. विशेष म्हणजे, व्हॉल्व्हमधून गळणारे पाणी थेट नाल्यात जाते. शहरातील जलकुंभावरून ज्याप्रमाणे नागरिक पाणी घेतात, त्याच प्रमाणे महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रामस्थ पाणी घेण्यासाठी येतात. तसेच वाटसरूही पाणी पिण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात जातो. हा प्रकार कार्यकारी अभियंत्यांच्या लक्षात आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही यापुढे कुणालाही पाणी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी बजावला आहे.

लिकेजेसकडेही दुर्लक्ष : शहराच्याअनेक भागांतील जलवाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. दाबाने पाणीपुरवठा झाल्यास जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सतत घडतात. त्यामुळे लिकेजेसमधून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होतो, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर संक्रांत : झोपडपट्टीतराहणाऱ्या नागरिकांकडे पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे ज्या जलकुंभालगत झोपडपट्टी वसली आहे, ते नागरिक जलकुंभावरून पाणी नेतात. मात्र, आता पाणी नेण्यास मज्जाव घातल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर संक्रांत कोसळली आहे.

अवैध नळ जोडण्यांकडे दुर्लक्ष : जलकुंभावरूनपिण्यापुरते पाणी नेण्यास मज्जाव केला आहे. निलंबनाची धमकी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्यांवर मात्र कार्यकारी अभियंत्यांची कृपादृष्टी आहे. या अवैध नळजोडण्यावरून २४ तास पाण्याची चोरी केली जाते. पाणी पिण्यापुरतेच नव्हे, तर वाहने धुण्यासाठी वापरले जाते. मात्र, हा प्रकार अद्यापही कार्यकारी अभियंत्यांच्या नजरेत आलेला दिसत नाही.

१४.८०
मोर्णा
(४१.४६)
उमा
२.५७
(११.६८)
निर्गुणा
काटेपूर्णा
२०.७०
२०.७०
(२८.८५)
( ८६.३५)
(दलघमीनुसार, कंसात कॅपेसिटी)
जलकुंभ परिसरातून दोन लीटर पाणी नेण्यासही मज्जाव करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. कर्मचाऱ्यांचे पाणी घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींसोबत वाद होत आहेत.