आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीची दुरुस्ती सुरूच, शहराचा पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत हाेण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरालापाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा १८ ऑक्टोबरपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा १७ ऑक्टोबरपासून सुरळीत होण्याचा दावा केला होता.
शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ६०० मिलिमीटर ९०० मिलिमीटर व्यासाच्या दोन मुख्य जलवाहिन्या जलकुंभापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करतात. परंतु, यापैकी ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील प्लांट बंद आहे. त्यामुळे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, १४ ऑक्टोबरला पहाटे कान्हेरी गावाजवळ ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. तसेच लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. शनिवारी दुपारपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता मनपाने व्यक्त केली आहे.