आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजना मनपाच चालवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहर पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार नाही. मात्र, योजनेच्या देखभालीसाठी मनपाला पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ सरकारकडून पुरवण्यात येईल, अशी घोषणा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. अामदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोला पाणीपुरवठा योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
त्याला उत्तर देताना मंत्री लोणीकर म्हणाले, या योजनेवर सरासरी वार्षिक ४.५० कोटी एवढा तोटा होत आहे. मनपाकडे सध्या ३४ हजार ६१३ नळजोडण्या आहेत. शहरात कुठेही पाणी मीटर्स नाहीत. अनधिकृत नळजोडण्या मोठ्या संख्येने आहेत.

या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आहे. त्यातही सदर योजना मनपाने चालवावी, असा निर्णय झाला आहे. तोट्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्वीकारू शकत नाही, असे सांगत महापालिकेस योजनेच्या देखभालीसाठी मनुष्यबळ सरकार पुरवेल, असे लोणीकर म्हणाले.