आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी, अभियंते-सरपंच यांचे मंथन, निर्णय लांबणीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषद अधिकारी, अभियंते सरपंचांनी मंगळवारी ६४ खेडी पाणीपुरवठा याेजना कंत्राटी पद्धतीने चालवण्यावर मंथन केले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या सभेत प्रशासनाने सरपंचांकडून अालेल्या सूचना एेकून घेतल्या. मात्र, तूर्तास याेजना कंत्राटी पद्धतीने चालवायची की, नाही, यावर ठाेस निर्णय हाेऊ शकला नाही.
खांबाेरा ६४ गाव पाणीपुरवठा याेजनेंतर्गत पाणीपट्टी वसुली ते टक्केच हाेत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काेपुलवार यांनी २० अाॅगस्टला अायाेजित जलव्यवस्थापन समितीच्या सभेत दिली हाेती. ही याेजना २००८ मध्ये जिल्हा परिषदकडे हस्तांतरित झाली. हस्तांरणाच्यावेळी याेजनेमध्ये ८९ कर्मचारी कार्यरत हाेते. मात्र, अाज केवळ ३७ कर्मचारी अाहेत. डिसेंबरपर्यंत अाणखी १० कर्मचारी निवृत्त हाेणार अाहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून तर २७ कर्मचाऱ्यांवर याेजना राबवण्याची जबाबदारी येऊन पडणार अाहे. वसुली हाेत नसल्याने पैसा जमा हाेत नसून,जलवािहन्यांची दुरुस्ती करता येत नाही. देयक थकल्याने कधी पाणीपुरवठा , तर कधी विद्युत पुरवठा खंडीत हाेताे. परिणामी ग्रामीण भागातील जनतेच्या राेषाला सामाेरे जावे लागत असल्याचे काेपुलवार यांनी सांगितले हाेते.

मूळयाेजनेत हाेते १२३ कर्मचारी : खांबाेरा६४ गाव पाणीपुरवठा याेजनेंतर्गत पाणी कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी दिल्यास जवळपास १२३ कर्मचारी काम करतील, असे अभियंत्यांचे म्हणणे अाहे. मूळ याेजनेत १२३ कर्मचारी हाेते. काेटी ७३ लाखाची ही याेजना वसुलीसह चालवण्यासाठी द्या, असे काही अभियंत्यांचे म्हणणे अाहे. अाॅगस्ट अखेर १७ काेटी ३८ लाख रुपये थकले अाहेत.
सरपंचांनीिदली ग्वाही : थकबाकीवसुलीसाठी सभेत सरपंचांनी ग्वाही दिली. कंत्राटी पद्धतीने याेजना चालवल्यास वसुली झाल्यास कंत्राटदार अप्रिय निर्णय घेऊ शकताे. त्यामुळे प्रशासन या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणार अाहे.

कंत्राटीचा ठराव बारगळला : पाणीपुरवठायाेजना कंत्राटी पद्धतीने चालवण्याला सदस्य गाेपाल काेल्हे यांनी यापूर्वी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत विराेध केला हाेता. शिखर समितीच्या कार्यपद्धतीप्रमाणे वसुलीसाठी प्रयत्न केल्यास वसुली पूर्ण हाेऊ शकते, असे काेल्हे यांनी सांगितले हाेते.

पाण्यासाठी राेज केवळ रुपये
प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी राेज केवळ रुपये द्यावे लागतात; परंतु बहुतांश ग्रामस्थ पाणीपट्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे अाहे. मात्र, सरपंचांसह पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कार्यवाही हाेत असल्याने ग्रामपंचायततर्फे कार्यांन्वित हाेत असलेल्या पाणीपुरवठा याेजनेची थकबाकी अल्प असल्याचे निरीक्षण अभियंते नाेंदवतात.
बातम्या आणखी आहेत...