आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत, अंतर्गत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महानजल शुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने २१ ऑक्टोबरला पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सकाळी अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दुपारी चार वाजता जंपर तुटल्याने पुन्हा विद्युत प्रवाह खंडित झाल्याने पाणी वितरण व्यवस्था कोलमडली. एेनसणासुदीच्या दिवसांमध्ये पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाणीपुरवठ्यातील अडचणी काही केल्या दूर होत नसल्याने एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यात सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून काही भागांना तीन, तर काही भागांना चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रयत्नामुळे समस्येत भर पडली आहे. १४ ऑक्टोबरला मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. चार दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु, वीज प्रवाह खंडित झाल्याने पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. विस्कळीत पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, तर २१ ऑक्टोबरला महान येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा पुन्हा खंडित झाला. परिणामी, अनेक भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दसरा तोंडावर आला असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

महावितरणचे दुर्लक्ष
एक्स्प्रेसफीडर असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले नाहीत. याबाबत ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, काहीही फरक झाला नाही. महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.\\

अधिक दाबाने पुरवठा
^रबी हंगाम सुरू झाला आहे. कृषिपंपांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. यामुळेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. महावितरण अधिक दाबाने विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहेत.'' विकास आढे, जनसंपर्क अधिकारी