आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५५ हजार जणांना पाणी केव्हा? मनपा प्रशासनामध्ये इच्छाशक्तीचा अभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २४ पैकी तीन गावांना महापालिकेला केव्हाही पाणी पुरवठा करणे सहज शक्य आहे. केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे भौरद, मलकापूर आणि उमरी या गावातील ५५ हजार नागरीक पाणी पुरवठ्यापासून वंचित आहे. यापूर्वी मलकापूर आणि भौरद या गावांचा पाणी पुरवठा केवळ डिमांडचा भरणा केल्याने तर उमरी गावाचा पाणी पुरवठा पाणी टंचाईच्या नावाखाली बंद करण्यात आला होता. परंतू आता या गावांचे पालकत्व महापालिकेकडे आले आहे. त्यामुळे महापालिका आपले पालकत्व केव्हा निभावणार? असा प्रश्न या भागातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
महापालिकेची हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रालगत वसलेल्या उपनगरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा बोजा महापालिकेला सहन करावा लागत होता. मलकापूर, भौरद, शिवनी, शिवर आदी गावांची हद्द आणि महापालिकेची हद्द यात काहीच अंतर राहिलेले नव्हते. मलकापूर गावाला अकोला पाणी पुरवठा योजनेवरुन पाणी पुरवठा केला जात होता. परंतु पाणीपट्टी थकल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तर भौरद ग्राम पंचायतीने महापालिकेकडे अकोला पाणी पुरवठा योजनेवरुन पाणी पुरवठा करण्याचीमागणी केली होती. यासाठी महाजल योजनेतून जलवाहिनी आणि जलकुंभ उभारण्यासाठी भौरद ग्राम पंचायतीला दोन कोटी ५० लाख रुपयाचा निधीही मिळाला. २००८ ला मंजुर झालेल्या योजनेतून २०११ ला मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे आणि सहा लाख ५० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे कामही पूर्ण झाले. अकोला पाणी पुरवठा योजनेतील शिवनगर भागातील जलकुंभातून भौरद ग्राम पंचायतीला पाणी पुरवठा करण्याचा प्रस्तावही महासभेने मंजुर केला होता. महापालिकेने केवळ एक वर्षाची पाणीपट्टी अनामत रक्कम म्हणुन भरण्याची नोटीस जारी केली होती. परंतु या रकमेचा भरणा केल्याने पाणी पुरवठा सुरु होऊ शकला नाही.
खरपग्राम पंचायतीची स्किम चांगला पर्याय : पूर्वीअसलेल्या महापालिका क्षेत्राच्या अनेक भागात जलवाहिन्या नसल्याने २० टक्के नागरिकांना गोड्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. आता महापालिकेत समाविष्ट झालेली काही गावे खारपाणपट्ट्यात येतात तर काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन खरप ग्राम पंचायतीने त्या भागातील नागरिकांना पाच रुपयात २० लिटर मिनरल वॉटर देण्याची सुरु केलेली स्किम महापालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी तुर्तास पाणी पुरवठा करणे शक्य नाही, त्या भागात बीओटी तत्वावर सुरु केल्यास नागरिकांनाही कमी पैशात गोड्या पाण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

महापालिकेचीच जबाबदारी
मलकापूर ग्रामपंचायतीलाही अकोला पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात होता. परंतू मलकापूर ग्राम पंचायतीकडे पाच कोटी ७० लाख रुपयाची पाणीपट्टी थकल्याने पाणी पुरवठा बंद केला. भौरद ग्राम पंचायतीने ५७ लाख रुपये अनामत रक्कम भरल्याने पाणी पुरवठा सुरु झाला नाही. तर उमरी ग्राम पंचायतीने ३६ हजार रुपये दरमहा पाणीपट्टी या नुसार पाच महिन्याची आगाऊ रक्कमेचा तसेच पाच लाख ६० रुपये अनामत रकमेचा भरणा करुनही केवळ पाणी टंचाईच्या नावाखाली पाणी पुरवठा सुरु झाला नाही. आता पर्यंत या गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची नव्हती. त्यामुळे विविध कारणांमुळे पाणी पुरवठा सुरु करता आला नाही. परंतु आता ही गावेच मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा सुरु करण्याची जबाबदारी आता मनपाचीच आहे.

पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी
^पाचवर्षापूर्वी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. परंतु नागरिकांना पाणी पुरवठा योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. आता आमचा भाग महापालिकेत समाविष्ट झाला आहे. नव्या पद्धतीने कराचा भरणा करावा लागणार आहे. त्यामुळेच नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने पूर्ण करणे गरजेचे आहे. महादेवबेलोकार, ज्येष्ठ नागरिक भौरद

महापालिकेला आता पाणी पुरवठा करावाच लागेल
^उमरी भागाला पाणी पुरवठा सुरु करण्यास कोणत्याही अडचणी नाहीत. आता ग्राम पंचायतही अस्तित्वात नाही. तर महापालिकेने अद्याप या गावांचे रेकॉर्ड केवळ ताब्यात घेण्याची घाई केली. ग्राम पंचायतही नाही आणि महापालिकेत कोणी वाली नाही, यामुळे नागरिक वेठीस धरल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मनपाने पाणी पुरवठा सुरु करण्याचे कर्तव्य पार पाडावे. दादामते पाटील, माजी िज.प.अध्यक्ष

अडचणी नाही केवळ इच्छाशक्ती : मलकापूरचा पाणीपट्टीअभावी पुरवठा बंद झाला. तर उमरी ग्राम पंचायत परिसराला दोन महिने पाणी पुरवठा केला गेला. पाणी टंचाईच्या नावाखाली तो बंद झाला. तर भौरद गावाला हायड्रोलिक टेस्टिंग झाल्याने पाणी पुरवठा सुरु केला जाऊ शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...