आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्यासाठी लवकरच पीएमसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. याअनुषंगानेच तांत्रिक सल्लागार समितीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत या निविदा प्रसिद्ध होतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
अकोला पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जलवाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या असून, शेकडो व्हॉल्व्हमुळे काही भागांना दोन वेळा, तर काही भागांना पाणीपुरवठाच होत नाही. तसेच जलकुंभाची संख्याही कमी झाली आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. राज्य केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी निधी दिला जातो. त्यासाठी योग्य प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. याअनुषंगाने महासभेत प्रस्तावही मंजूर करण्यात आलेला आहे. प्रस्ताव तयार केल्यानंतर पुढे मंजुरीच्या वेळी कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती (पीएमसी) करणे गरजेचे आहे. तांत्रिक सल्लागार नियुक्तीसाठी ई-निविदा बोलावण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत पीएमसीसाठी निविदा प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. एकीकडे निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे येत्या काही महिन्यांत जलशुद्धीकरण केंद्रात नवे पंपही दाखल होतील.