आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे माणसा, पाणी बचतीचा घेरे वसा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जलसप्ताहा निमित्त दैनिक दिव्य मराठी अाणि अकाेला पाटबंधारे विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात अाली हाेती. भविष्यातील पाण्याचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी स्पर्धकांनी अापापल्या निबंधात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना तसेच त्यांनी सुचवलेल्या उपाययाेजनाही वाचकांसाठी प्रसिद्धीस देत अाहाेत. अकाेला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा अमरावती जिल्ह्यातील शेकडाे विद्यार्थी, नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अापल्या निबंधातून प्रत्येकानेच पाण्याची बचत किती महत्त्वाची अाहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्राप्त झालेल्या निबंधांमधील ठळक मुद्दे वाचकांसाठी देत अाहाेत.
जल ही जीवन
गौतम बुद्ध- याजगात एक काळ असा येणार आहे, पाण्यासाठी युद्ध होतील, त्यामुळे पाणी वाचवा.
} संतज्ञानेश्वर- ‘नगरेचिरचावी महावने चि लावावी ।। जलाशये निर्मावी नानाविध ।।’
} महात्माजोतिबा फुले- शेतकऱ्यांच्याजीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
त्यासाठी गंभीरतेने "पाणी अडवा पाणी जिरवा' यासारख्या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जनचळवळ निर्माण व्हायला हवी. झाडे जगवणे, विहिरीचा पुनर्भरण, शेततळे, बंधारे उभारणे या उपाययोजना करून आपण शेतकऱ्याला वाचवू शकतो.

} वी.स. खांडेकर -‘केवळ बाह्य समाज बदलून किंवा नाना प्रकारचे कायदे करून दैन्य, दु:ख दारिद्र्य यांचे निर्मूलन करता येणार नाही. त्याकरिता श्रम, बुद्धी, ज्ञान आणि धन ही सर्व अंशत: तरी समाजाच्या कारणी लावण्याची भावना हवी.’
थोर विचारवंतांचे पाण्याबद्दलचे विचार
{आज महाराष्ट्रात जास्त धरणांची संख्या आहे. पण मग एवढा दुष्काळ का? याचे कारण म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीची जाण असतानाही निष्काळजीपणे पाण्याचा सर्रास नासाडी करणारे आपण.
{दुष्काळ आताचपडतात असं काही नाही. पूर्वीही ते पडायचे. अगदी छत्रपती शिवरायांच्या काळातसुद्धा. पण महाराजांनी अशा परिस्थितीत विविध उपाययोजनांचा अंमल करून दुष्काळाची झळ प्रजेला लागू दिली नाही. कुठेही शेतकऱ्यांच्या पिकांना धक्का लागू दिला नाही.
घरगुती कामासाठीपाणी बचतीचा अवलंब केला, तर प्रत्येक व्यक्तीला ८०.५ लीटर पाणी पुरते. परंतु, नेहमीच्या पद्धतीने आपणाला ३६६ लीटर पाणी लागते. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीमागे २८५.५ लीटर पाण्याची बचत करू शकतो.
{प्रत्येक कुटुंबामध्येव्यक्ती गृहीत धरल्या, तर दर दिवशी १४२७.५ लीटर तर महिन्यामध्ये ४२,८२५ लीटर पाणी वाचवू शकतो.
{इस्रायलसारख्या छोट्यादेशात भारत देशापेक्षा फारच अल्प प्रमाणात पाऊस पाणी पडतो. पण तेथील नियोजन महत्त्वपूर्ण असून व्यवस्थित आहेत. त्यामुळे तेथील जनता कर्तव्यदक्ष
असल्याने आज सुजलाम् सुफलाम् आहे.
महाराष्ट्रातून गोदावरी-६६८ किलोमीटर, तापी २०८ किलोमीटर, वर्धा ४५५ किलोमीटर, वैनगंगा २९५ किलोमीटर, तर नर्मदा ५४ किलोमीटर लांबी प्रदेशातून वाहते. योग्य नियोजन केले, तर समुद्रात वाहत जाणारे पाणी नक्कीच मानवी जीवन सुजलाम् सुफलाम् होईल.
पाण्यासंबंधी इंग्रजीराजवटीत भारताचा कारभार १९१९ त्यानंतर १९३५ च्या कायद्यानुसार चालवला जात होता. या कायद्यांनी पाणी त्यासंबंधीचे अधिकार संबंधित प्रांतांना किंवा राज्यांना दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पाणी या महत्त्वाच्या विषयाबाबत स्वतंत्र तरतुदी करून केंद्र राज्य सरकारलाही पाण्याबाबत कायदे तयार करण्याचे लवाद नेमण्याचे अधिकार बहाल केले.

अनुच्छेद२४६- याघटनात्मक तरतुदीनुसार पाणी आणि त्याचे नियमन नियंत्रण करण्यासाठी सातव्या अनुसूचीतील यादी मधील म्हणजे केंद्रीय सूचीत येणाऱ्या बाबीसंबंधी संसदेला यादी मधील म्हणजे राज्यसुचीतील बाबीसंदर्भात संबंधित राज्याला आणि यादी मधील म्हणजे एकत्रित सूचीतील बाबीसंबंधी राज्य विधिमंडळाला कायदा करण्याचा अधिकार आहे.
अनुच्छेद२६२- यानुसारसंसदेला आंतरराज्य नद्या किंवा नद्याखोरे यांच्या पाण्यासंबंधी कोणताही विवाद सोडवण्यासाठी कायदा करून लवाद नियुक्त करण्याचा अधिकार आहे.
राजेंद्रसिंह यांनीवाळवंटी राजस्थानमध्ये जोड निर्माण करून पाणीटंचाईचा फार मोठा प्रश्न सोडवला. त्यांनी मोठ्या जिद्दीने, कष्टाने दूरदृष्टीने परंपरागत पाणी साठवण्याच्या पद्धतीचे गावागावांतून जनजागरण केले. जुन्या पिढीतील कृषी शास्त्रज्ञ भागवतराव धोंडे यांनी कंटूर मार्करचा शोध लावला. जलसंवर्धनाच्या अनेक कामांत ते आजही उपयोगी आहे. वसंतराव टाकळकर यांनी महाराष्ट्रात लोकसहभागाने सुमारे ४६ हजार किलोमीटर लांबीचे सलग समपातळी चर खोदले आहेत. हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांनी गावाच्या मदतीने पाणीटंचाईवर माती केली गावाचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी डोंगरावर समपातळीची कामे केली. आडवी नांगर केली, झाडे लावली, चर खोडले, शेततळी तयार केली पाणी मिळवून पीक पद्धतीत बदल केला. सोलापूरचे कृषी शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांसाठी पाण्याची बँक काढली. तसेच शेताच्या कडेला आवश्यक तेवढे तळे खोदून त्यात प्लास्टिकचे कागद पसरून त्यात पावसाचे पाणी साठवायचे ते शेतीला वापरायचे ही कल्पना अमलात आणली.
पिण्याचे पाणी हे एक मौलिक धन आहे. म्हणून म्हणतात,
‘धन हे कुबेराच्या खजिन्यात नसते,
धन हे श्रीमंतांच्या धनकोशात नसते
तर खरे धन हे पाण्याने भरलेल्या
काळ्याभोर मेघांमध्ये असते
बरसणाऱ्या जलधारांमध्ये असते.’
हाकमारती बारव अश्रू गाळती तळे
घन आले दाटून जीव तळमळे
पाणी वाचवा फुलतील शेततळे
पाण्याचीरक्षा, देशाची सुरक्षा
पाणीसोना है, इसे नहीं खोना है।
पाण्याच्याप्रत्येक थेंबात आहे अमृत
पाण्यास वाचवून स्वत:ला करा पुरस्कृत
आताउरलंय पाणी जेमतेम
आता वाचवा पाण्याचा थेंब थेंब
जलऱ्हास म्हणजे मानव विनाश
जल बचत म्हणजे मानव विकास
ग्रामगीता- (अध्याय १३ ओवी ६९) नदी, तळ्याकाळची स्वच्छता, तेथे पार, घाट आदींची व्यवस्था ।।
उत्पादन वाढवया तत्त्वता उपयोग घ्यावा जलाचा ।।
(अध्याय १३ अोवी ६६)- श्रमदानाचे सप्ताह घेवोनि रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी ।।
शोषक खड्डे, मोऱ्या करोनि सांडपाणी थांबवावे ।।
‘निसर्गमित्रबनूनी मानवानं, जाणावे जल हेच जीवन,
पासाचा थेंब न् थेंब वाचवून, आपण दूर करू शकतो दुष्काळ’
‘आजचकरा विचार जलसंवर्धन, जलगुणवत्तेचा,
कोट्यवधी खर्च टाळा कृत्रिम पावसाचा’
येतोपाऊस पाऊस देतो दाण्याचा घास।
परि रुसला पाऊस घेतो बळीराजा फास ।।
उपाययोजना
१. मोठमोठ्या बिल्डिंग, हॉटेल, सरकारी ऑफिस, प्रत्येक घरात "वॉटर हार्वेस्टिंग'ची प्रणाली वापरली पाहिजे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. प्रत्येक घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जलपुनर्भरणाच्या माध्यमातून पुन्हा जमिनीत मुरवावे.
२. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा.
३. झाडे भरपूर लावा त्याची जोपासना करा. त्यामुळे नैसर्गिक मदत होऊन विपुल प्रमाणात पाऊस पडेल.
४. कुठे लिकेज असेल अथवा पाइपलाइन फुटली असेल, तर ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.
५. सार्वजनिक नळांना तोट्या बसवणे. पाणी भरणे झाल्यावर प्रत्येकाने नळाची तोटी बंद करावी.
६. "जलयुक्त शिवार', "पाणी अडवा पाणी जिरवा'हे अभियान चांगले अाहे. ते प्रभावीपणे गावागावांतून राबवावे.
७. पाण्याच्या मर्यादित वापरासाठी जनजागृती करणे.
८. प्रत्येक मानवापर्यंत पाणी बचतीविषयी जनजागृती कार्यक्रम पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.
९. अंघोळ करताना शॉवर टबमध्ये अंघोळ करण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन अंघोळ करावी. मुलांनी ब्रश करताना पुरुषांनी दाढी करताना नळ बंद करून ठेवावा. महिलांनी भांडी घासताना नळ बंद ठेवून बादलीत पाणी घेऊन कपडे भांडी स्वच्छ करावी.
एक जिद्द : होळीला पाणी बचतीची!
कुठे बहाव्याच्यापिवळ्याधमक फुलांचा शृंगार तर कुठे पळसाच्या लालजर्द फुलांची लाली. म्हणजेच होळीच्या स्वागतासाठी निसर्ग अगदी सज्ज झालेला आहे... निसर्गाची सर्वात अमूल्य भेट असलेल्या पाण्याची बचत करून आपणही येणाऱ्या उद्याची तजबीज करून या सणाचा आनंद द्विगुणित करूया. या होळीला आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या सोनेरी उद्यासाठी पाण्याची बचत करण्याचा केवळ प्रयत्न करू नका तर मनाशी खूणगाठच बांधा. जिद्द करा. याच हेतूने दैनिक भास्कर समूहाने नेहमीप्रमाणे या वेळीही अबीर गुलालासोबत टिळा होळी अभियान सुरू केले आहे. दैनिक भास्कर समूहाच्या कोट्यवधी वाचकांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व समजून घेतले आहे, ही सर्वात आनंदाची बाब आहे!

या होळीला आपण एक जिद्द करू, पाणी बचतीची जिद्द! होळीला आपण, आपल्या कुटुंबीयांना या जिद्दीत सहभागी करून तर घ्याच, शिवाय आपले शेजारीपाजारी आणि मित्रांनाही पाणी बचतीच्या या मोहिमेत सहभागी करून घ्या. आजचा आनंदही द्विगुणित होईल आणि भविष्यासाठी पाण्याची बचतही होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून अशा पद्धतीने हा सण साजरा करूया.

पाणी बचतीची अशीच जिद्द या वर्षी महाराष्ट्रानेही केली आहे. पाण्याची नासाडी टाळून ते पाणी शेती आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील जलतरण तलाव बंद राहतील. पुणे महापालिकेची कार्यालये, हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. गांभीर्याने याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

तर चला, या होळीला आपणही पाणी बचतीची जिद्द करूया. अबीर गुलालासोबत टीळा होळी खेळूया....!
बातम्या आणखी आहेत...