आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकर नागरिकांनी रक्तदान करुन केले नवीन वर्षाचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवं संकल्पनांनी वर्षाचे स्वागत केले जाते. एक व्यक्ती म्हणून जसे व्यक्तिगत संकल्पना असतात, तशीच सामाजिक बांधिलकी जपण्याची जाणिव देखील असते. हीच जाणीव जपत अकोलेकरांनी नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानाने केले.
दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ अकोला सेंट्रल आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात २० ते २५ नागरिकांनी रक्तदान केले. 
थॅलिसिमीया, सिकलसेल या आजारांसह दररोज होणारे अपघात अशा विविध कारणांमुळे दररोज शेकडो पिशव्या रक्तांची गरज भासते. मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने अनेक रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी रक्त तयार करणे शक्य नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या रक्त दात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे महा अभियान राबवण्यात अाले. 
जठारपेठ येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात अॅड. प्रकाश निर्मळ, अॅड. आनंद गोदे, प्रा. ज्ञानसागर भोकरे, कल्पेश गुप्ता, नीरज भांगे, भावेश काटकेरीया, सुभाष गोरे, सुनील देशपांडे, भावेश ठक्कर, अखिलेश पारीका, अमोल कसले, संदीप गांधी, संजय चव्हाण, केदार केळकर, सागर पांचोली, अली खान, शैलेंद्र कुमार दुबे यांच्यासह अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. 
 
या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ अकोला सेंट्रलचे अध्यक्ष अॅड. आनंद गोदे, सचिव प्रकल्प प्रमुख डॉ. ज्ञानसागर भोकरे, सुनील घोडके, अॅड. अजय वाघमारे, नवीन धोतकर, अॅड. सांगूनवेढे, शशांक जोशी, रवी कुलट, दिव्य मराठीचे चिफ रिपोर्टर श्रीकांत जोगळेकर, मिलींद गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. 
 
रक्तदात्यांचा सत्कार : यामहाअभियान अंतर्गत ज्या व्यक्तींनी रक्तदान केले त्यांना डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच रोटरी क्लब ऑफ अकोला सेंट्रल च्या वतीने देखील या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार अाहे. रक्तदात्यांचा सन्मान करून नुसते त्यांचे कौतुक नाही तर इतर लोकांना एक प्रकारे रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 
 
शिबिरात २५ जणांनी रक्तदान करत नव‌ वर्षाचा केला शुभारंभ 
नववर्षाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करण्यासाठीच्या आवाहनाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. डे-केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया सोसायटी डॉ. हेडगेवार रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर झाले. २५ जणांनी रक्तदान केले. थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश अलिम चंदानी, डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. समीर देशमुख, दीपक मायी, नीलेश जोशी, अश्विन पोपट, दीपक भानुशाली, संजय देम्बडा, अनिस खान, लुंडवानी, कुंगरानी यांच्यासह संदीप मोकाशी यांच्यासह रक्तपेढीची चमू उपस्थित होती. 
 
दरवर्षी असा उपक्रम राबवावा असेही रक्तदात्यांनी यावेळी स्पष्ट केले. रक्तदानातून इतरांसाठी मदतीचा हात देताना रक्तदात्यांनी सामाजिक जाणीव कायम ठेवली. त्यांचा प्रशस्ती पत्र पुष्प भेट देऊन गौरव केला.या वेळी रक्त दात्यांमध्ये आशिष जिवानी, शुभम काटोले, दीपेश जालोरी, मो. अन्सार मो साबीर, सुधीर बोळे, विवेक माहुरकर, रितेश पिल्ले, कन्हैया गुप्ता, जयेश जिवानी, अमोल बहादूरकर, रामस्वरूप लद्दड, मिलिंद कोवले, अंबरीश मेरेकर, मंगेश शाहू, कमल तोलानी, नरेंद्र तोलानी, दीपक अग्रवाल, प्रफुल्ल कवले, तुषार पुरोहित, अंकित यादव, सचिन पाताळवंशी, विशाल लुंडवानी, सतीश अजाडीवाल, प्रदीप मुदिराज, प्रदीप पाहुजा, विनीत बन्सल यांचा समावेश होता. 
बातम्या आणखी आहेत...