खामगांव (बुलढाणा) - बांधकाम सुरू असलेली विहीर ढासळल्याने आत फसलेल्या दोन युवकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाहेर काढण्यात आाला आहे, तर दुसरा सुमारे 22 तासांपासून विहिरीत फसलेला आहे. खामगांव तालुक्यातील काळेगांवजवळ असलेल्या वडजी भेंडी येथे सोमवारी दुपारी हा अपघात झाला. गावक-यांच्या अथक परिश्रमानंतर एक मृहदेह बाहेर काढण्यात आला, तर दुस-याचा शोध अजूनही सुरू आहे. हे दोघेही काळेगांव येथील रहिवाशी असून ते विहिरीच्या बांधकामावर पाणी देत होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश बोचरे (22) असे या अपघातातील मृत युवकाचे नाव आहे, तर भागवत मांगटे (27) याचा शोध घेण्यात येत आहे. वडजी भेंडी येथे सुमारे 100 बाय 100 चौरस फुट खाजगी विहिरीचे बांधकाम सुरू होते. हे दोघेही येथे काम करत होते. सोमवारी अचानक विहीर घसरल्याने दोघेही आत फसले. ही वार्ता वा-यासारखी परिसरातील गावोगावी पोहचली नि नागरिकांनी विहीरीभोवती गर्दी केली. रात्रभर या ठिकाणी शोधकार्य सुरू होते.
90 टक्के बांधकाम विहिरीत
विहिरीचे सुमारे 90 टक्के बांधकाम आत कोसळल्याने फसलेल्या युवकांना बाहेर निघता आले नाही. आत 35 फुट पाणी असल्याने रातोरात 10 मोटारी लावून विहिरील पाणी उपसण्यात आले.
फिरकली नाही शासकीय यंत्रणा
गावातील नागरिकांनीच युद्धपातळीवर दोघांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. मात्र कोणतीही आपत्कालीन शासकीय यंत्रणेने येथे ढुंकूणही पाहिले नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो..
सर्व फोटो- प्रशांत अमलकार