आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपमुळे मिळाली चोरीला गेलेली दुचाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकी मूळ मालकाला परत देताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
दुचाकी मूळ मालकाला परत देताना पोलिस कर्मचारी.
बुलडाणा - पंधरादिवसांपूर्वी चोरीला गेलेली मोटार सायकल व्हॉटसअपवरील मॅसेजमुळे अवघ्या काही तासात मिळाली आहे. कागदपत्राच्या तपासणी नंतर ही दुचाकी मुळमालकाला परत देण्यात आली. ही घटना आज ११ डिसेंबर रोजी घडली. दुचाकी मिळाल्याबद्दल मालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. मोबाईल मधील व्हॉटसअपचा चांगला उपयोग केला तर तो समाज हिताचा ठरतो. याच मॅसेजमुळे चोरीला गेलेली दुचाकी मुळ मालकाला मिळाली. शहरातील रहिवासी मानकर यांचा बाजार समिती समोर वेल्डिंगचा व्यवसाय आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी एम.एच. २८/ एक्स/ ६८३७ या क्रमांकांची आपली मोटार सायकल घरासमोर उभी करून ठेवली होती. त्याच रात्री अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. पंधरा दिवस त्यांनी शोध घेतला. परंतु दुचाकी मिळाली नाही. दरम्यान डिसेंबर रोजी दुचाकी शिंदे गुरूजी कन्या शाळेसमोरील पटांगणात उभी असल्याची माहिती पोलिस दक्षता पथकाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांना मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती ठाणेदार अंबादास हिवाळे विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हरिष ठाकुर यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केली. यावेळी प्रभाकर वाघमारे यांनी अनेक व्हॉटस ग्रुपवर दुचाकी मिळाल्याचा मॅसेज पाठविला. या मॅसेज वाचताच दुचाकीचे मालक मानकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. कागदपत्रांची तपासणी करून त्यांना दुचाकी परत करण्यात आली. यावेळी एपीआय हरिष ठाकुर, पीएसआय मनिषा हिवराळे, दक्षता पथकाचे प्रभाकर वाघमारे, पेाहेकॉ पवार उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...