आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणार: तांबोळा शिवारात वीज तारांच्या घर्षणामुळेे गहू जळून खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार- एक एकर शेतातील गव्हाची कापणी करून शेतात ठेवलेल्या पेंड्या वीज तारांच्या घर्षणामुळे जळून खाक झाल्या. काही वेळात शेतातील संपूर्ण गव्हाचे पीकही जळाल्याची घटना आज मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता तांबोळा येथे घडली. या घटनेत शेतमालकाचे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
 
लोणार तालुक्यातील तांबोळा येथील शेतकरी आत्माराम मारोती खोटे यांचे गट नंबर ३४२ मध्ये चार एकर शेत आहे. त्यापैकी एका एकरामध्ये त्यांनी गव्हाची पेरणी केली होती. रात्रंदिवस त्यांनी गव्हाला पाणी दिले. दरम्यान दोन दिवसापुर्वी त्यांनी गव्हाची कापणी करून त्याच्या पेंड्या शेतात वाळण्यासाठी बांधून ठेवल्या होत्या. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वीज तारांचे घर्षण होवून त्याच्या ठिणग्या सोंगून ठेवलेल्या गव्हाच्या पेंड्यावर पडल्या. हवेचा जोर अधिक असल्याने काही वेळातच शेतातील गव्हाच्या पेंड्यानी पेट घेतला. 

या घटनेत शेतातील संपूर्ण गहू जळून खाक झाला आहे. यात खोटे यांचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वीज कर्मचारी महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच तलाठी शिंदे वीज ठेकेदार रवींद्र जावळे यांनी शेतात जावून पंचनामा केला. यावेळी पंच म्हणून रवींद्र जावळे, प्रकाश आटोळे, संतोष आवारे, दिपक मापारी विजय ओव्हर हे उपस्थित होते. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...