आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षा परवान्यांना विधवांचा "नो रिस्पॉन्स'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीसाठी नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विधवा पत्नीच्या नावे ऑटोरिक्षा परवाने वितरित करण्याची योजना सुरू केली आहे. २१ फेब्रुवारी २०१६ ला ही योजना लाँच करण्यात आली. मात्र, एक महिना उलटूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकही लाभार्थी महिला राज्य उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आली नाही. या योजनेचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे योजनेची माहितीच पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचलीच नाही. आता या योजनेचा प्रचार अन् प्रसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशा महिलांसाठी परवाने वितरित करण्याची योजना "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन' या नावाने राज्यभर राबवण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून अशा महिलांना ऑटो विकत घेण्यासाठी बुलडाणा अर्बनने १०० टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यानंतरच अशा महिलांसाठी आरटीओ विभागाला परवाने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आरटीओ विभागाकडे आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील एकही महिला आरटीओ विभागाकडे आल्यामुळे अद्यापपर्यंत एकही परवाना देण्यात आला नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकार यांनी दिली आहे.

महिलांनी लाभ घ्यावा
^आत्महत्याग्रस्त शेतकरीकुटुंबांतील विधवांना ऑटोरिक्षा परवान्यासाठी अनेक नियमांमध्ये शिथिलता आणि सूट देण्यात आली आहे, असे असताना एकही महिलेचा अर्ज आमच्याकडे आला नाही. या योजनेचा फायदा त्यांनी घ्यावा. लागेल ते मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. महिलेला कुठलीही अडचण येणार नाही. या याेजनेमुळे अात्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना अाधार मिळणार अाहे. '' राजेंद्र वाढोकार, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, अकोला.

३८६ शेतकरी विधवा
जिल्ह्यामध्ये २००१ पासून आतापर्यंत १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर एकट्या अकोल्यात ३८६ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींची संख्या आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी ऑटोरिक्षा व्यवसायाकडे वळावे.
बातम्या आणखी आहेत...