आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पत्नीच्याअंगावर रॉकेल ओतून तिला जाळल्याच्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली. याप्रकरणी न्यायालयाने आठ साक्षीदार तपासून, आरोपी पतीची निर्दोष मुक्तता केली आहे.
अंजूूम परवीन नाझीम बेग यांचे लग्न नाझीम बेगसोबत २००८मध्ये झाले होते. लग्नानंतर पती नाझीम बेगने प्लॉट विकत घेण्यासाठी पत्नीला माहेरहून १० हजार आणण्याचा तगादा लावला हाेता. तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी देत होता. माहेरहून पैसे आणल्यामुळे नाझीम बेग यांनी पत्नी अंजूम परवीन हिचा छळ करून, तिच्या अंगावर मार्च २०१३ रोजी आरोपीच्या घरी हमजा प्लॉट येथे रॉकेल ओतून तिला जाळले, असे अंजूम परवीन यांनी मृत्यूपूर्व बयाण दिल्यामुळे जुने शहर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध भादंवि ३०७, ४९८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायालयाने यात आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. दिलदार खान, अॅड. जफर खान यांनी काम पाहिले.