आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रेमीयुगलास कर्मचाऱ्याच्याच पत्नीने दिला चोप, अकोल्यातील घटनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पोलिस मुख्यालयात कार्यरत पती त्याच्या प्रेयसीला रंगेहात पकडून दोघांनाही पत्नीने चोप दिल्याची घटना मंगळवारी दुपारी बाळापूर नाक्यावर घडली. विशेष म्हणजे प्रेमी युगुल हे गणवेशात कर्तव्यावर होते.

ते दोघेही पोलिस मुख्यालयात कार्यरत असून, दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. आपल्याला पत्नी असल्याचे भानही तो विसरला. त्याच्या प्रेमसंबंधाची कुणकुण पोलिस खात्यासोबतच त्याच्या घरापर्यंत पाेहोचली होती. आपल्या पतीचे संबंध पोलिस महिलेशी असल्याची खात्री केल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पत्नीने अनेक प्रयत्न केले. मंगळवारी पती त्याची प्रेयसी बाळापूर नाक्यावरील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने बाळापूर नाका गाठून पती त्याच्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पती-पत्नी त्या महिला कॉन्स्टेबलमधील वाद मिटवला.
बातम्या आणखी आहेत...