आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची निर्घृण हत्या, पतीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - शहरातील चिखली येथील परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका महिला होमगार्डची पतीकडून निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी २८ ऑगस्टला उघडकीस आली. या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असून, मूर्तिजापूर शहर पोलिसासमोर आरोपीने स्वतः आत्मसमर्पण केले.
 
त्यानुसार तत्काळ त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार संशयित आरोपी पतीने कैचीने सपासप वार करून आपल्या होमगार्ड पत्नीची निर्घृण हत्या केली. मृत झालेल्या होमगार्ड महिलेचे नाव राजश्री संजय निशानराव असे असून, त्या मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत होत्या. 

चारित्र्याच्या संशयावरून त्यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतक महिलेला तीन मुले होती, त्यापैकी मोठा मुलगा मागील वर्षी रेल्वेखाली येऊन मृत्यू पावला तर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले आणि तिसरा मुलगा ११ व्या वर्गात शिकत आहे. संशयित आरोपी संजय निशानराव हा मोलमजुरी करीत असून, पत्नी होमगार्ड असल्याने नेहमी दोघांचे चारित्र्यावर संशय घेऊन भांडणे होत होती. काल रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रात्रभर त्यांचे हे भांडण सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. रात्रभर चाललेल्या या भांडणाचा शेवट सोमवारी सकाळी वाजता पत्नीच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून समाप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक गजानन पडघन पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पंचनामा केला असून, पुढील कारवाई शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...