आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांच्या एलपीजी गॅस सबसीडीतून भरवला जाणार गरीबांना घास,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एलपीजी गॅसची सबसीडी नाकारल्याने अनेक गरीब महिलांना स्वस्त दरात गॅस कनेक्शन (उज्ज्वला योजना) देता आले. आता हीच पद्धत अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत अंगीकारली जाणार असून त्यासाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे, असे िजल्हा प्रशासनाचे आवाहन आहे. दरम्यान, या आवाहनाला अनुसरुन काही नागरिकांनी तयारी दर्शविल्याचे जिल्हा वितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे असून लकरच त्या सबसीडीच्या आधारे गरीबांना धान्य पुरवठा केला जाणार आहे. त्यांच्या मते जे गरजू लाभार्थी इष्टांच्या मर्यादेमुळे (बीपीएलचे गुण) रेशनच्या योजनेत समाविष्ट होऊ शकले नाहीत, अशा लाभार्थ्यांना प्रामुख्याने या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहे.

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह ३५ किलो प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह किलो अन्नधान्य सवलतीच्या दराने पुरवले जाते.
वरील प्रमाणे नमूद केलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, असे लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट झाले तर शासनावर पडणारा आर्थीक भार कमी होईल. अर्थात तीच रक्कम गरीबांना धान्य पुरवण्याकडे वळवता येईल, असे शासनाचे म्हणणे आहे.

येथे नाकारता येईल सबसिडी
गरजनसलेल्यांना अन्नधान्याची सब्सीडी नाकारण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे mahafood.gov.in हे संकेतस्थळ अाहे. तर दुसरा पर्याय तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध नमुन्यात अर्ज भरुन देणे, हा आहे. त्यासाठी संबंधितांनी आपली संमती दर्शवून ते अर्ज संबंधीत शिधावाटप कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हापुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...