आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न साेडवणार; पारसला बैठक घेणार, ऊर्जा मंत्र्यांची विधी मंडळात ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पारस प्रकल्पग्रस्तांचे नाेकरीसह इतरही प्रश्न प्राधान्याने साेडवण्यात येतील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली. प्रकल्पाबाबत १९ अाॅगस्ट राेजी ऊर्जामंत्री पारस येथे बैठक घेणार अाहेत. बैठकीत ते शेतकरी पारस प्रकल्प संघर्ष कृती समितीशी चर्चा करणार अाहेत. याबाबत अामदार विनायकराव मेटे यांनी लक्षवेधी सूचना केली हाेती. 
 
पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी १४१ शेतकऱ्यांकडून १३० हेक्टर शेतजमीन संपादित केली हाेती. काही महिन्यांपूर्वी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पाची पाहणी केली हाेती. त्यानंतर ६६० मेगावॅटचा प्रकल्प कार्यांन्वित हाेईल, अशी शक्यता व्यक्त हाेत हाेती. मात्र, १० जुलै राेजी मंत्रालयातील उर्जामंत्र्यांच्या सदनात पारस येथे अाैष्णिक वीज प्रकल्पाएेवजी २५ मेगावॅटचा साैर उर्जाप्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. 
दरम्यान, प्रकल्पाबाबत ऊर्जामंत्र्यांकडे बाजू मांडण्यात येईल, असे पारस प्रकल्प संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी कळवले अाहे. 
 
लेखीनिवेदनात दिली हाेती स्थगितीची माहिती :अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे केंद्र सरकारचे असलेले धाेरण पाण्याची अनुउपलब्धता यांमुळे पारस प्रकल्प स्थगित केल्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी यापूर्वी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निवेदनाद्वारे दिली हाेती. याबाबत अामदार विनायक मेटेंससह सहा सदस्यांनी लक्षेवधी उपस्थित केली. त्यानंतर शुक्रवारी याबाबत सभागृहात चर्चा झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...