आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना ‘सीसीटीव्ही’चे होतेय शवविच्छेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - घातपात, अपघात, आत्महत्या, आकस्मिक मृत्यू अशा नानाविध कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूनंतर मृतकाच्या मृत्यूमागील कारण कळण्यासाठी शवाचे विच्छेदन केल्या जाते. परंतु, बंद असलेल्या या शवागारात नेमके विच्छेदन कसे केले जाते. आत काय होते, शवाची प्रतारणा करण्यात येते का? याबाबतची माहिती नातेवाइकांनाच नसते. त्यामुळे या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हाभरातील शवविच्छेदनगृहात अशी कोणतीच व्यवस्था नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव शेगाव येथे मोठी सामान्य रुग्णालय आहेत, तर इतर ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शवविच्छेदनगृह नाहीत. त्यामुळे मृतदेहाला दुसऱ्या ठिकाणी नेताना नातेवाइकांची अक्षरश: फरपट होते. मात्र, दु:खच्या काळात मानसिकता पूर्णत: खचून जात असल्याने याकडे दुर्लक्ष होते. परंतु, अनेक वेळा शवविच्छेदनाबाबत लोकांच्या तक्रारी येतात. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवल्या जातो. अशा वेळी वैद्यकीय अधिकाऱ्याकडेही काहीच पुरावा नसतो. फक्त काढण्यात आलेला व्हिसेरा एकमेव तपासणीसाठी ठेवण्यात येतो. असे व्हिसेरा रुग्णालयातील शवागारात धूळ खात पडलेले आहेत. याबाबत प्रशासनाकडून काहीही हालचाली होत नाहीत. महत्त्वाचा मुद्दा हाच उपस्थित होत आहे की, आत काय होते, हे कुणास ठाऊक?.

महिलामृतदेहाचीही विटंबना शक्य : शवागारातदेहाचे विच्छेदन करताना आत कोणीच नसते. फक्त बाहेरच सह्या घेऊन नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिल्या जातो. मृतदेह शवागारात नेल्यानंतर महिला मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याच्या जुन्या घटना आहेत. त्यानुळे ‘सीसीटीव्ही’ आवश्यक आहे.

ग्रामीण रुग्णालय : धाड,देऊळगावमही, बीबी, लाखनवाडा, वरवट बकाल, देऊळगावराजा, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, मोताळा

उप जिल्हा रुग्णालय - खामगाव,शेगाव, मलकापूर

जिल्हा सामान्य रुग्णालय- बुलडाणा

प्राथमिक आरोग्य केंद्र- ५३

अवयव काढल्यास पाहणारा कोण?
कोणत्याहीपुरुष अथवा स्त्रीच्या मृत्यूनंतर किमान सहा तासांच्या आत त्याचे अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या कामी पडतात. अर्थातच डोळे, मूत्रपिंड इतर अवयव काढल्यानंतर त्याची माहिती कधीच नातेवाईक घेत नाही. शक्यतो असा मृतदेह घरीसुद्धा नेत नाहीत. त्यामुळे शासनाने शवागारात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा लावण्याची व्यवस्था करावी. मयूरपातुरकर, बुलडाणा

‘प्राथमिक’लाही व्यवस्था नाही
जिल्ह्यातप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृह नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची गरज नाही. मात्र, शवविच्छेदनगृह असायला पाहिजे. शवविच्छेदनगृह असले तरी त्याकरिता वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेच रिक्त आहेत.

पोलिस स्टेशनस्तरावरही नाही शवागार
ज्याठिकाणी पोलिस स्टेशन आहे. अशा ठिकाणी तत्काळ शवविच्छेदन होण्यासाठी शवागार असणे गरजेचे आहे. परंतु, जिल्ह्यात पोलिस स्टेशनच्या ठिकाणीही शवागार नाहीत.

फक्त मेडिकल कॉलेजमध्येच सीसीटीव्ही
शवागारातमृतकाचे विच्छेदन करताना कोणत्याही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची परवानगी नाही. कारण शक्यतोवर कुठल्याही घटना शवागारात घडत नाही. मात्र, अशा सीसीटीव्ही वैद्यकीय महाविद्यालयात लावण्यात येतात. जिल्हास्तरावर अशी यंत्रणा नाही. ए.व्ही. सोनटक्के, जिल्हाशल्यचिकित्सक, बुलडाणा
बातम्या आणखी आहेत...