आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या जाचास कंटाळून महिलेने घेतले जाळून, आरोपी पतीला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सासरच्या जाचास कंटाळून दोन मुलांच्या आईने स्वत:ला जाळून घेतले. त्यात ती ९३ टक्के भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुडधी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्वॉर्टरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीती आशिष देशमुख, वय ३८ असे विवाहितेचे नाव आहे. प्रीतीचे माहेर खामगाव येथील केलानगर आहे. प्रीतीचा विवाह अकोला येथील आशिष बाबूराव देशमुख यांच्यासोबत झाला असून, त्यांना वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रीतीला ती अशक्त असल्यामुळे तिचा पती सासरचे मानसिक शारीरिक छळ करत होते. तसेच ती अशक्त असल्यामुळे तिचा पती दुसरे लग्न करण्यास तिची परवानगी मागत होता माहेरहून पैशांची मागणी करत होता.

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून प्रीतीने आत्महत्येचा मार्ग अवलंबला. तिने शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यामध्ये ती ९३ टक्के भाजली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शनिवारी सकाळी प्रीती देशमुखचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रिती देशमुख हिचा भाऊ दीपक हनुमंतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पती आशिष देशमुख, सासरा बाबूराव देशमुख आणि सासू निर्मला देशमुख यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.