आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरील महिलेसह चिमुकल्यास कंटेनरने चिरडले, तीन जण बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली- भरधाव जाणाऱ्या कंटनेरने समाेर असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एक महिला तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चिखली -जालना महामार्गावरील मुरादपूर फाट्याजवळ घडली. विशेष म्हणजे, या अपघातात दुचाकीस्वारासह दोन मुले बालंबाल बचावली. 


अंत्री खेडेकर येथील रहिवासी अमोल बाबुराव मोरे हे आपल्या एच.एच. २८/ अे.डब्ल्यू/ ५६१४ या क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी पूनम, सहा महिन्याचा मुलगा सम्राट भावाच्या दोन मुलांना घेऊन जात होते. मुरादपूर फाट्याजवळ येताच मागून येणाऱ्या एच.एच. १२/ एम.व्ही. ९७०० या क्रमांकाच्या कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सौ. पूनम अमोल मोरे वय ३० त्याच्या मांडीवर असलेला चिमुकला सम्राट अमोल मोरे वय महिने हे दोघे रस्त्यावर पडले. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात अमोल मोरे त्यांच्या भावाची दोन मुले बालंबाल बचावली आहेत. 


या वेळी संतप्त जमावाने कंटेनर चालकाला मारहाण करून कंटेनरच्या काचा फोडल्या. तर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेवून संतप्त जमावाला शांत केले. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी दोन्ही मायलेकाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील रुग्णालयात हलविले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल बोंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेवून अपघाताची माहिती जाणून घेतली. 

बातम्या आणखी आहेत...