आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: वाघिणीच्या हल्ल्यात महिला ठार, सी-वन नावाच्या नरभक्षक वाघिणीने चार बळी घेतल्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- शहापूर शेत शिवारात वाघिणीच्या हल्ल्यात एक ६० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. कान्हाेत्री हिरालाल नवडे (६०, रा. चिलाेठी ता. मुलताई) असे मृतक महिलेचे नाव आहे. सी-वन नावाच्या या नरभक्षक वाघिणीने दोन महिन्यांपूर्वी ब्रम्हपुरी परिसरात धुमाकुळ घालत चार ते पाच जणांचा बळी घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. 

नवडे कुटुंब मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शहापूर शेत शिवारात जरूड येथील श्यामराव वानखडे यांच्या शेतात रखवालीचे काम करतात. सद्या कान्होत्री यांचा मुलगा सुन बाहेरगावी गेले होते. त्यामुळे शेतातील झेापडीत पतीसोबत ती राहत होती. दरम्यान, सोमवारी सकाळी वाजताच्या सुमारास कान्होत्री या शेतातच प्रात:विधीसाठी जात असताना या वाघिणीने त्यांच्यावर झेप घेऊन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी शहापूर शेतशिवाराकडे धाव घेतली. वरूड पोलिस वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वरूड येथे पाठवला होता. 
बातम्या आणखी आहेत...