आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बन्सीलाल नगरातील दारूचे दुकान बंद; मातृशक्तीच्या आंदोलनास यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - शहरातील बन्सीलाल नगर येथे थाटण्यात आलेले दारूचे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या तथा अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी महिलांनी मलकापूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर, तर बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन केले होते. अखेर या आंदोलनाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेऊन हे दारूचे दुकान बंद केले. दुकान बंद झाल्यामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 
बन्सीलाल नगर येथे कल्याण नामक दारू विक्रीचे दुकान सुरू झाले होते. या दुकानामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले व्यसनाधीन बनत होते. 

या बाबीला आळा घालण्यासाठी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांनी मातृशक्तीला एकत्र करून दारू दुकान बंद करण्यासाठी लढा उभारला. दरम्यान निवेदने, आंदोलने केली. हरीतालिकेच्या दिवशी एसडीओ कार्यालयातच मातृशक्तीने हरितालिकेची पूजा केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. तसेच सप्टेंबर रोजी प्रशासनाला निवेदनाद्वारे आजपासून तीव्र अांदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याची धास्ती घेत गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उइके यांनी पोलिस निरीक्षक अंबादास हिवाळेसह पोलिस बंदोबस्तात कल्याण नावाच्या या दारूच्या दुकानाला सील ठोकले. त्या धर्तीवर प्रेमलता सोनोने यांनी मातृशक्ती समवेत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या यशाची माहिती दिली. या वेळी मलकापूर ग्रामीणच्या सरपंच विद्या वराडे, कुसुम शिंगोटे, मनाेरमा कचाले, उर्मिला सातव, मंगला जगताप, शोभा तायडे, सुनीला बोरसे, ज्योती चावडा, प्रतिभा ठाकुर, आशा भुटे, मंदा कोलते, सरला तायडे, रेखा सपकाळ, रुपाली धारस्कर, अर्चना वानखेडे, मंदा सपकाळ, शीला मोहाडे, प्रीती कथने, प्रिया खर्चे, देवकाबाई सोनाेने, शरयू सोनोने आदी महिला उपस्थित होत्या. 
 
जिल्ह्यात दारूबंदी होईपर्यंत लढा सुरूच 
आजआमच्या आंदोलनाला यश आले असून, हे यश म्हणजे खऱ्याअर्थी मातृशक्तीचा विजय होय. आम्ही केवळ लोकहिताची चळवळ राबवली. आमचा जिल्हा हा राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊंचा जिल्हा असून, या जिल्ह्यात दारूबंदीसाठी आमचा लढा सुरू राहील हा जिल्हा दारूमुक्त होईल तेव्हाच खऱ्याअर्थी मातृतीर्थ जिजाऊंचा सन्मान होईल अशी माहिती प्रेमलता सोनोने यांनी पत्रपरिषदेत दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...