आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक ‘टायगर डे’निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जगभरातवाघाचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या संवर्धनासाठी दरवर्षी २९ जुलैला टायगर डे साजरा करण्यात येतो. यंदाच्या टायगर डे ला राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात शासनाने सूचना दिल्या असून, जिल्हास्तरावरही विविध कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृतीकरिता रेहबर कॉन्व्हेंटमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
वाघ हा पर्यावरण साखळीतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्याच्या संवर्धनासाठी अनेकविध उपाययोजना जगभरात राबवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही व्याघ्र संवर्धनासाठी वन, वन्यजीव सामाजिक वनीकरण विभागासह स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या टायगर डे ला यंदा जनजागृतीवर विशेष भर देण्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर एका समितीचे गठन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व उपवनसंरक्षक, वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सदस्य राहणार असून, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक हे सदस्य सचिव राहतील. तर, यापैकी सर्वात ज्येष्ठ अधिकारी समितीच्या अध्यक्षस्थानी राहील. या समितीमार्फत जिल्ह्यात वन, वन्यजीव विशेषत: वाघांची पर्यावरण तथा मानवी जीवनासाठी अनिवार्यता उपयोगिता स्पष्ट करण्याच्या हेतूने छायाचित्र प्रदर्शन, चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.

तसेच शाळा, विद्यालय, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. व्याख्यान, जनजागृती फेरी घेण्याचेही सुचवण्यात आले आहे. तसेच प्रसिद्धी माध्यमातूनही या दिनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जागतिक व्याघ्र दिनाच्या अनुषंगाने मुख्य सोहळा मंत्रालयाच्या आवारात तसेच वन विभागाच्या विविध कार्यालयात, व्याघ्र प्रकल्पात आयोजित करण्यात येईल. तर, जिल्हापातळीवरही नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सुचवण्यात आले असून, त्या दृष्टीने समितीचे गठन करून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ‘टायगर डे’ निमित्त विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे.

विद्यार्थ्यांमध्येही जागृती
वाघहा पर्यावरणातील महत्वाचा घटक असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्याची जाणीव व्हावी, या दृष्टीने शाळांमध्येही जागृती करण्यात येणार अाहे. सामाजिक वनीकरण विभागाने याबाबत नियाेजन केले असून आंतरराष्ट्रीय ‘टायगर डे’ निमित्त विविध कार्यक्रम हाेणार अाहे. या कार्यक्रमांच्या नियाेजनासाठी जिल्हा स्तरावर समितीचे गठन करण्यात येणार अाहे.

उपाययोजनांची माहिती
शहरातीलरेहबर कॉन्व्हेंटमध्ये टायगर डे निमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन २९ जुलैला करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व्याख्यान, छायाचित्र, माहितीपटाच्या साहाय्याने वाघाच्या प्रजाती, त्यांचा अधिवास, त्यांची उपयोगिता, पर्यावरणातील महत्त्व, वाघांसमोरील आव्हाने, उपाययोजना आदींविषयी इत्थंभूत माहिती देण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धिप्रमुख गोविंद पांडे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...