आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आंदोलनाचा बिगुल अकोल्यातून; माेदी सरकारवर पुन्हा माजी अर्थमंत्र्यांचा ‘हल्लाबाेल’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘नाफेडने तूर, मूग, उडीद खरेदीसाठी ठरवलेली विशिष्ट क्विंटलची मर्यादा अन्यायकारक आहे. ती दूर करून शेतमाल आधारभूत किमतीनुसार खरेदी न केल्यास देशव्यापी अांदाेलन छेडले जाईल अाणि त्याचा बिगुल अकाेल्यातून फुंकण्यात येईल,’ अशी घाेषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी रविवारी केली. शेतकरी संवाद यात्रेत बाेलत हाेते. ते अकोल्यात बोलत होते.
 
नोटबंदी पूर्णपणे अपयशी
शेतकरी जागर मंचानं अकोल्यात व्याख्यान आयोजित केले होते. तिथे यशवंत सिन्हा यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटबंदी, जीएसटी आणि भारतीय शेतकरी’ या विषयावर मत मांडले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला.
आपल्या भाषणाची सुरुवातच यशवंत सिन्हांनी मोदींना टोमणा मारुन केली. यशवंत सिन्हा म्हणाले, “मी ‘मित्रों’ म्हणणार नाहीय.”. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.  नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जात आहेत. आपण लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
 
देशाचे भले नाही
“आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नाही. त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरुप महत्वाचे आहे. जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणाऱ्या आहेत. यावेळी या विसंगती लवकर दूर न केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.”, असेही सिन्हा म्हणाले.
 जीएसटी म्हणजे गुड अॅंन्ड सिम्पल टॅक्स नाही, तर आता एवढा जटील केला आहे की बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स झाला आहे, असे म्हणत त्यांनी जीएसटीवरही निशाणा साधला. आता राजशक्तीविरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. आपल्या वयावर बोलणाऱ्यांबद्दल बोलताना, संघर्ष करायला वयाची कोणतीच सीमा नसते, असे म्हणत यशवंत सिन्हांनी जेटलींना टोला लगावला.
 
टॅक्ससाठी दहशतवाद शब्दही कमी पडतो 
आम्ही विरोधी पक्षात होतो. तेव्हा टॅक्स टेरिरिझम सुरु असल्याची टीका आम्हीच करीत होतो. मात्र आता त्यापेक्षाही भयानक परिस्थिती असून, टॅक्ससाठी दहशतवाद हा शब्द कमी पडतो. 

अर्थव्यवस्थेतासाठी घातक 
सिंपल अॅड गुड टॅक्स, असा अर्थ अभिप्रेत असलेला जीएसटी  सरकारने गुंतागुंतीचा करुन ठेवला अाहे.  जीएसटीमध्ये प्रचंड विसंगती असून, या विसंगती दूर न झाल्यास ते अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले. 20 लाखाची उलाढाल असलेल्या एखाद्या व्यापाऱ्याकडे संगणक, तज्ज्ञांची सल्ला घेणे, रिटर्न भरण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसते. त्यामुळे व्यापारीही मेटाकुटीस अाल्याचे सिन्हा म्हणाले. 

अपयशी निर्णयावर काय बाेलावे ?
राेखीने हाेणारे सर्वच व्यवहार काळे असतात, वैध नसतात, असे गृहित धरणे चुकीचे असते अशा शब्दात, यशवंत सिन्हा यांनी नाेटी बंदीवर टीका केली. नाेंद बंदीचा निर्णयच अपयशी हाेता. त्यामुळे त्यावर अधिक बाेलण्याची अावश्यकता नाही,  असाही टाेला सिन्हा यांनी लगावला. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...