आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्हांच्या आंदोलनास आता उद्धव, पवार, आंबेडकरांचा पाठिंबा; अनेक ठिकाणी अांदाेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याख्यानासाठी अकोल्यात आलेले महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीसुद्धा पाेलिस मुख्यालयात सिन्हा यांची भेट घेतली. - Divya Marathi
व्याख्यानासाठी अकोल्यात आलेले महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीसुद्धा पाेलिस मुख्यालयात सिन्हा यांची भेट घेतली.

अकाेला- शेतकऱ्यांच्या अार्थिक उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सुरू केलेले अांदाेलन मंगळवारीही सुरूच हाेते. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भारिप-बमंसचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब अांबेडकर यांनीही सिन्हा यांच्याशी मोबाइलवर चर्चा करून अांदाेलनाला पाठिंबा दिला.


शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतमालाची नाफेडने हमीभावाने खरेदी करावी, या मागणीवरून प्रशासन व अांदाेलकांतील बाेलणी फिसकटल्याने दुसऱ्या दिवशीही अांदाेलनाची धग कायम आहे. नाफेडतर्फे संपूर्ण शेतमाल खरेदीचा मुद्दा हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शेतकरी जागर मंचच्या प्रतिनिधींनी हा शेतमाल पणन महासंघाने खरेदी करावा, हा प्रस्ताव ठेवला. मात्र प्रशासनाने सकारात्मकता न दाखवल्यानेच ही बाेलणी फिसकटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

 

असे जुळले सिन्हा यांचे अकाेल्याशी ऋणानुबंध

यशवंत सिन्हा यांचा एका इंग्रजी वृत्तपत्रात २७ सप्टेंबर राेजी अर्थव्यवस्थेवर प्रकाशझाेत टाकणारा लेख प्रकाशित झाला. तो वाचल्यानंतर शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे सिन्हा यांच्या संपर्कात अाले. त्यानंतर जागर मंचने सिन्हा यांना अकाेल्यात शेतकरी संवाद यात्रेचे निमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारून १५ अाॅक्टाेबर राेजी प्रमिलाताई अाेक सभागृहातील कार्यक्रमाला हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देशव्यापी  अांदाेलनाचा बिगुल अकाेल्यातून फुंकण्यात येईल, अशी घाेषणा सिन्हा यांनी  त्या वेळी   केली हाेती. रविवारी कासाेधा परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून सिन्हा उपस्थित हाेते. येथूनच अांदाेलनाचा बिगुल फुंकण्यात अाला.

 

बड्या नेत्यांच्या पाठिंब्यानंतर तुषार गांधीही भेटीला...

साेमवार पासून पोलिस मुख्यालयात ठिय्या मारून बसलेले सिन्हा यांना मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अॅड. बाळासाहेब अांबेडकर यांनी पाठिंबा दिला. यादरम्यान व्याख्यानासाठी  अकोल्यात  आलेले महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीसुद्धा  पाेलिस मुख्यालयात सिन्हा यांची भेट घेतली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, अाज आप, तृणमूल नेते येण्याची शक्यता ...

बातम्या आणखी आहेत...