आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावमुक्त जीवनासाठी याेग प्राणायाम अावश्यक; पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याेग प्राणायाम शिबिरात बाेलताना पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील. या वेळी व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर पदाधिकारी. - Divya Marathi
याेग प्राणायाम शिबिरात बाेलताना पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील. या वेळी व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर पदाधिकारी.
अकाेला- ‘स्पर्धेच्या युगात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग प्राणायामाशिवाय पर्याय नाही,’ असे प्रतिपादन पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी केले. त्यांनी याेग प्राणायामाचे महत्त्व वैद्यकीय भाषेत पटवून दिले. भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, किसान सेवा समिती, युवा भारत या पाचही संघटनेतर्फे गोरक्षण राेडवरील शुभमंगल हॉलमध्ये योग अायाेजित शिबिरात ते बाेलत हाेते. 
 
पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी नागपूर येथील मिहानमध्ये हाेणाऱ्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्रात सुरु असलेल्या योग सामाजिक कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमात भाजप नेते डाॅ. अशोक ओळंबे यांनी योग साधनेमुळे लोकांना होणाऱ्या आरोग्य लाभाचे फायदे सांगितले. कार्यक्रमात पतंजली परिवाराचे पदाधिकारी भारती शेंडे, शंकर नागापुरे, पुरूषोत्तम आवळे, दयाराम मेतकर, सुहास काटे, श्वेता बेलसरे, दिगंबर मेहरे, वेणुगोपाल शेंडे, महेश खानचंदानी, हरीष माखीजा, हरिष पारवाणी, सुनील नारखेडे, नितीन मिश्रा, डाॅ. गजानन कऱ्हे, चंद्रकांत अवचार, सतीश टोंपे, अँड. सोनी, मिना पाटील, कल्पना शिरसाट, सुमन महल्ले, सुरेश दरेकर, निर्मला काळे, राणी मनवानी, स्वाती सबनीस, शुभांगी सबनीस, डाॅ. राजेश भोंडे, डाँ रुद्रेश कऱ्हे, संजय लाड, रामभाऊ बिडकर, कपील लाड, सुशील मेतकर यांच्यासह माेठ्या संख्येने योग साधक, साधिका उपस्थित होत्या.
 
याेगभवनासाठी प्रयत्न 

जिल्ह्यातयाेग-प्राणायामचा प्रसार-प्रचारासाठी मदतीचे अाश्वासन पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी दिले. जिल्ह्यात याेग भवानासाठीही प्रयत्न करण्यात येथील, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात याेग प्राणायामचे वर्ग घेण्यात येतात. अनेक भागात विशेष शिबिरही घेण्यात येतात. शिबिरांचे अायाेजन पतंजली याेग समिती, महिला याेग समिती, भारत स्वाभिमान संघटना, युवा भारत, किसान सेवा समितीतर्फे करण्यात येते. या शिबिरातील याेग साधक-साधिका वर्गांमध्ये सहभागी हाेतात. 

 
बातम्या आणखी आहेत...